मुंबई : सिंधुदुर्गात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील काही बसस्थानकांची डागडुजी व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री विवेक भिमणवार यांची विधानभवनातील आपल्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली. पालकमंत्री नितेश राणे राणे (Nitesh Rane) यांनी आज एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमणवार यांच्याशी आपल्या दालनात घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील एसटी सेवांबाबत आणि कारभाराबाबत प्रदीर्घ चर्चा केली.
पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात मिनी बस सेवा सुरू करणे तातडीची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.या मागणीला एसटी महामंडळाच्या संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मिनी बस सेवा सुरू करण्याचे सांगितले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी जिल्ह्यातील काही बसस्थानके दुरावस्थेत असल्याचे ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या बसस्थानकांची तात्काळ डागडुजी करून सुशोभीकरण करण्याच्या सूचना ही पालकमंत्री यांनी दिल्या. गावा गावांचा संपर्क वाढविण्यासाठी बसेच्या फेऱ्यात वाढ करण्याच्या सूचना ही पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच रिक्त असलेले विभाग नियंत्रक पद तात्काळ भरण्याच्या सूचना ही अधिकाऱ्यांना दिल्या.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…