मुंबई: दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर आणि गीतकार कल्पना राघवेंद्र यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. या गायिकेने मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरी झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या हैदराबादच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रिपोर्टनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पना यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचे घर दोन दिवसांपासून उघडले नव्हते. यानंतर असोसिएशनच्या सदस्यांना याबाबत सूचना देण्यात आली होती. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून गायिकेच्या घरात प्रवेश केला. यावेळी कल्पना या बेशुद्धावस्थेत सापडल्या. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गायिकेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबतचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गायिकेची तब्येत आता स्थिर आहे. ती सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे. ज्यावेळेस गायिकेने आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा तिचे पती घरी नव्हते. ती चेन्नईमध्ये होती.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…