Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीनगरसेवक रोहन खेडेकर भाजपात दाखल

नगरसेवक रोहन खेडेकर भाजपात दाखल

नामदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर (Rohan Khedekar) यांनी नामदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

रोहन खेडेकर वार्ड क्रमांक सातमधून निवडून आले. त्यावेळी ते उभाठा सेनेमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अखेर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबई येथील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.

Konkan Railway : होळीसाठी गावी जायचंय पण तिकीट नाही तर चला, ११ मार्चपासून कोकण रेल्वेची दादर रत्नागिरी विशेष गाडी

देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये रोहन खेडेकर यांच्या प्रवेशामुळे भाजपाचे बळ वाढले आहे. भाजपाचे सभागृहातील नगरसेवक आता १२ झाले आहेत.

यावेळी भाजपाचे नेते बाळ खडपे, नगरसेवक बुवा तारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -