बंगळूरु : भाविश अग्रवाल यांनी स्थापन केलेली भारतीय इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी गेल्या काही आठवड्यांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. पाच महिन्यांपूर्वी या कंपनीने कंपनीने नोकरकपात जारी केली होती. यामध्ये सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले होते. त्यानंतर आता पुन्हा ओला इलेक्ट्रिक (OLA Electric) कंपनीने नोकरकपात काढली असून १००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय (OLA Electric layoffs) घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळालं होते. या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनी विविध पदांवरील जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून तोटा कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कंपनीकडे सध्या जवळपास ४००० कर्मचारी आहेत. त्यापैकी २५ टक्के कर्मचाऱ्यांना ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीमधून घरी पाठवले जाऊ शकते. (OLA Electric layoffs)
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे प्रमुख भवीश अग्रवाल यांच्याकडून नोव्हेंबर २०२४ पासून पुनर्रचना योजना सुरु करण्यात आली होती. त्यानुसार कंपनीत विविध पदांवर काम करणाऱ्या कामगारांना कामावरुन कमी केलं जाऊ शकतं. ओलाकडून अद्याप किती कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाईल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, कंपनीच्या प्रवक्त्यांनी फेररचना केल्यानं ग्राहक सेवांमध्ये सुधारणा झाल्याचं म्हटलं. याशिवाय उत्पादन वाढवण्यासाठी ज्या गरजेच्या नसलेल्या पदांना रद्द करण्यात आलं आहे. (OLA Electric layoffs)
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…