माहुलमधील प्रकल्प बाधितांच्या घरांची लॉटरी; पालिका कामगारांना मिळणार साडेबारा लाखांमध्ये घर

Share

मुंबई : मुंबई पालिकेच्या ताब्यात असलेल्या प्रकल्पबाधितांच्या सदनिकांमध्ये कुणीही प्रकल्पबाधित जायला तयार नसल्याने आता सदनिका प्रशासनाने विक्रीला काढल्या असून माहुलमधील या सर्व सदनिकांची कामगारांना विक्री करण्यासाठी महापालिकेने जाहीर केली असून येत्या १५ मार्चपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात होणार आहे. या सदनिकांचा लाभ चतुर्थ श्रेणी आणि तृत्तीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना होणार आहे.

एमएमआरडीएच्या वतीने बांधलेल्या सदनिका महापालिकेला विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी हस्तांतरीत केल्या आहेत. माहुल आंबा पाडा येथील एवर स्माईल, एस जी केमिकल, व्हिडीओकॉन अतिथी आदी ठिकाणच्या बऱ्याच सदनिक या प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन केल्यानंतर रिक्त आहेत. या सर्व रिक्त सदनिकांची संख्या १३ हजारांच्या आसपासून असून या ठिकाणी कोणीही प्रकल्प बाधित जाण्यास तयार नसल्याने या सदनिका पडून आहेत. या सर्व सदनिकांची विक्री महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना करण्यात येणार आहे.

याबाबत महापालिका प्रशासनाच्यावतीने जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ही या योजना केवळ महानगरपालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असेल,असे प्रशासनाने नमुद केले आहे.

पालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मुंबई मध्ये घर उपलब्ध करून, त्यांच्या प्रवासाचा वेळ कमी करणे आणि कामाची क्षमता वाढवणे हे ही योजना राबवण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे या याजनेच्या माध्यमातून पालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत घर घेण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या योजने मध्ये, माहुल, एस.जी. केमिकल व विडीयोकॉन अतिथी येथील एक सदनिका १२.५ लाख रुपये अधिक मुद्रांक व नोंदणी शुल्क व दोन सदनिका २५.०० लाख अधिक मुद्रांक व नोंदणी शुल्क या दराने विकण्याचे नियोजित केले आहे.

कर्मचाऱ्यास १ किंवा २ (जोडी) सदनिका विकत घेण्याची मुभा तथा पर्याय असेल. तसेच त्यांनी त्यानुसार अर्जा मध्ये नमूद करायचे आहे. त्यामुळे सर्व खाते प्रमुखाने आपल्या आधिपत्याखालील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या योजने बाबत अवगत करावे तसेच पालिकाच्या सर्व संघटनेस अवगत करावे, असेही या जाहिरितीत नमुद केले आहे.

लॉटरी सोडतीचा कार्यक्रम

  • शनिवारी (१ मार्च) या घरांच्या सोडत योजनेसाठी जाहिरात प्रकाशित

  • येत्या १५ मार्चपासून ऍपद्वारे ऑनलाईन अर्जाला सुरुवात

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १५ एप्रिल

  • येत्या १६ एप्रिला सर्व अर्जांची यादी होणार प्रसिध्द

  • लॉटरीची सोडत २० एप्रिला काढली जाणार

  • यशस्वी अर्जदारांना अनामत रक्कम भरण्याची दि.२० एप्रिल ते ५ मे

  • अर्जदारांनी ५ मे ५ जूनपर्यंत सदनिकाच्या एकूण किमतीचे २५ टक्के किंवा पूर्ण रक्कम भरणे.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

22 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

55 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago