दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आज (रविवार २ मार्च २०२५) साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. हा अ गटाचा शेवटचा साखळी सामना आहे. ब गटाचे साखळी सामने आधीच पूर्ण झाले आहेत. आजच्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममधील सामन्यात जिंकणारा संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि हरणारा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरीत खेळणार असलेल्या संघाचा सामना दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य फेरीत खेळणार असलेल्या संघाचा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध जिंकला तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना दुबईत होणार आहे. पण भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध हरला तर काय करणार या प्रश्नाचे उत्तर निकालानंतर आयोजकांकडून दिले जाण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे आयोजकांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील भारताच्या सर्व साखळी सामन्यांचे आयोजन दुबईत केले. यामुळे भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध हरला तर लाहोरमध्ये जाऊन खेळणार की भारताच्या सामन्याचे आयोजन दुबईतच होणार हा प्रश्न या क्षणाला अनुत्तरीत आहे. आयोजकांनी अंतिम सामना रविवार ९ मार्च रोजी होणार आणि त्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. पण हा सामना पाकिस्तानमध्ये होणार की दुबईत हे अद्याप जाहीर केलेले नाही.
विराट कोहलीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली रविवारी ३०० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तो २०१७ मध्ये २०० वा एकदिवसीय सामना पण न्यूझीलंड विरुद्धच खेळला होता. कोहलीने त्याच्या २०० व्या एकदिवसीय सामन्यात शतक केले होते. यामुळे ३०० व्या एकदिवसीय सामन्यात तो काय करतो याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.
न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने न्यूझीलंड विरुद्ध ४२ एकदिवसीय सामने खेळून ४६.०५ च्या सरासरीने १७५० धावा केल्या आहेत. यात पाच शतके आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध ३१ एकदिवसीय सामने खेळून ५८.७५ च्या सरासरीने १६४५ धावा केल्या आहेत. यात सहा शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी आणखी १०५ धावांची आवश्यकता आहे.
न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
न्यूझीलंड : टॉम लॅथम (यष्टीरक्षक) , मिचेल सँटनर (कर्णधार) , विल यंग , डेव्हॉन कॉनवे , केन विल्यमसन , रचिन रवींद्र , ग्लेन फिलिप्स , मायकेल ब्रेसवेल , मॅट हेन्री , के. जेमिसन , विल्यम ओरोर्क , डॅरिल मिचेल , नॅथन स्मिथ , मार्क चॅपमन , जेकब डफी
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार) , केएल राहुल (यष्टीरक्षक) , शुभमन गिल , विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल , हार्दिक पांड्या , रवींद्र जडेजा , हर्षित राणा , मोहम्मद शमी , कुलदीप यादव , रिषभ पंत , वॉशिंग्टन सुंदर , अर्शदीप सिंग
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…