Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडच मास्टरमाईंड!

Share

आरोपपत्रात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्येचा एकत्रित उल्लेख

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) वाल्मिक कराड (Valmik Karad) हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर येत आहे. अवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीतून झालेल्या वादानंतर ही हत्या करण्यात आली, असा उल्लेख पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात करण्यात आला आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला (Santosh Deshmukh murder case) दोन महिन्यांहून अधिकचा कालावधी उलटला असला तरी हत्येच्या कटातील आरोपी असलेला कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. आरोप पत्रात फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा नंबर आठव्या क्रमांकावर आहे.

२६ फेब्रुवारी रोजी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नियुक्त केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh murder case) सीआयडी बीडच्या विशेष मकोका कोर्टात वाल्मिक कराडसह आठ आरोपींच्या विरोधात एक आरोप पत्र दाखल झाले. हे साधारण १४०० पानांचे आरोपपत्र असून खंडणीसह अपहरणाच्या प्रकरणात मोठे उलगडे आणि गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

आरोपींना फरार करण्यास मदत करणारे डॉ. संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करुन यांना तात्काळ सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पोलिसांनी सादर केलेल्या (Santosh Deshmukh murder case) आरोप पत्रात पहिल्या क्रमांकाचा गुन्हेगार हा वाल्मिक कराड आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर विष्णू चाटे, तिसऱ्या क्रमांकावर सुदर्शन घुले आणि त्या खालोखाल प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे यांचा समावेश आहे. या प्रकरणातील आरोपींची क्रमवारी ही त्यांच्या कृत्यानुसार ठरवण्यात आली आहे. यातील प्रमुख आरोपी हा सुदर्शन घुले असून त्यानेच सरपंच देशमुख यांना जबर मारहाण केल्याचे यात उल्लेख करण्यात आला आहे. असेच संतोष देशमुख यांना घेऊन जाणारा व्यक्तीही सुदर्शन घुले होता.

खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख

Santosh Deshmukh murder case : २९ नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. त्यानंतर सहा डिसेबरला देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद झाला आणि मारहाण झाली. या महाराणीच्या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी दाखल झाली होती. त्यानंतर ९ तारखेला देशमुख यांची हत्या झाली होती. या तिन्ही प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते एकत्रित असून त्यांनी हा कट कुठे रचला, याची संपूर्ण माहिती पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागली आहे. याशिवाय देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ सीआयडीकडे उपलब्ध आहे. खंडणी मागितली आणि ती न दिल्यामुळे देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे जवळजवळ उघड असल्याने ८० दिवसांमध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर (Santosh Deshmukh murder case) धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून आरोपी पळून गेले होते. त्यावेळी वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. स्कॉर्पिओत एकूण सहा आरोपी होते. केज पोलीस आरोपींचा पाठलाग करत होते. पोलिसांनी वाशी चौकात नाकाबंदीही केली होती. पोलीस पाठलाग करत असल्याची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले होते. या घटनेचा ९ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. घटना घडल्यानंतर देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी कळंबकडे कोणाच्या सांगण्यावरून वळवला याची चौकशी करण्यात यावी.

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

1 hour ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

1 hour ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

1 hour ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago