ठाणे : ऑनलाईन अथवा बोगस अॅपद्वारे फसवणुकीच्या (Online Fraud) घटना होऊन देखील पैशांच्या लालसेपायी उच्च शिक्षित व्यक्तीदेखील अशा आमिषाला बळी पडत असल्याची घटना कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ट्रेडिंग अॅपमधून मोठा नफा मिळणार असल्याचे बघून आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची तब्बल एक कोटी २० लाखांची फसवणूक झाली आहे. (Fraud Case)
कोपरी भागात राहणारे विनोद शर्मा ५५ (नाव बदलून) हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. ट्रेडिंगसारख्या ऑनलाईन अॅपद्वारे जास्त पैसे मिळतील याची ते चाचपणी करत होते. यावेळी एका ट्रेडिंग अॅपमधून मोठा नफा मिळेल या आशेने त्यांनी सुरुवातीला काही रक्कम गुंतवली. या अॅपवरील ट्रेडिंग कंपनीने पहिल्या खेपेत सुमारे ४० ते ५० हजारांचा नफा झाला. त्यामुळे या अॅपमधून आपण रग्गड पैसे कमवू ही लालसा विनोद यांच्या मनात निर्माण झाली.
जानेवारी ते फेब्रुवारी या सव्वा ते दीड महिन्याच्या कालावधीत अॅपवर दर्शवल्याप्रमाणे विनोद हे कधी चार लाख कधी दोन लाख असे पैसे गुंतवत गेले. तुम्हाला लवकरच अधिक पैसे मिळतील अशी बतावणी समोरून करण्यात येत होती. त्यामुळे आपल्याला आज ना उद्या जास्त पैसे मिळतील या विश्वासावर विनोद होते. मात्र थोड्या कालावधीत आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी सायबर विभागाकडे अर्ज करण्यात आला आहे. (Fraud)
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीटदर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…