आंगणेवाडी (प्रतिनिधी): कमल पदी तुज नमितो माते, जय जय भराडी देवी… जय जय भराडी देवी…! असा ध्वनीक्षेपकावर चालू असलेला देवीचा गजर, महाप्रसादाचा सोहळा पाहण्यासाठी देवालयाच्या प्रांगणात उसळलेली भक्तांची गर्दी असाच नजारा शनिवारी रात्री आंगणेवाडीत पाहावयास मिळाला. महाप्रसाद ताटे लावण्याच्या कार्यक्रमासाठी रात्री ९.४५ वाजता बंद झालेली दर्शन रांग पुन्हा रात्री १.३० नंतर चालू झाली. सकाळच्या सत्रापेक्षा सायंकाळी भाविकांनी अनुभवली ती उच्चांकी गर्दी.
रविवारी सुद्धा भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी यात्रा परिसर फुलुन गेला होता. प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवाची सांगता रविवारी सायंकाळी उत्साहात झाली. दोन दिवसांत आंगणेवाडीत सुमारे आठ लाख भाविकानी देवीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील दर्शन रांगांमधील भाविकांचा ओघ रविवारी सायंकाळनंतर चालूच होता. रविवारी आंगणे ग्रामस्थानी देवीचे दर्शन घेऊन ओट्या भरल्या.
शनिवारी रात्री गर्दीचा ओघ वाढला सायंकाळ नंतर भाविकांची गर्दी उत्तरोत्तर वाढत गेली. रात्री बारा नंतर तर देवालयाच्या बाहेरील परिसरात रस्त्यावरुन चालणे अवघड बनले होते. यात्रेच्या दोन दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाली. मनोरंजनाच्या खेळण्यांच्या भागात बच्चे कंपनीची गर्दी झाली होती. यात्रोत्सवात सेवा दिलेल्या शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचे यावेळी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. मोड यात्रेत शेतीची अवजारे व गृहपयोगी साहीत्य खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.
एकूण नऊ रांगाद्वारे दर्शन व्यवस्था आंगणे कुटुंबीयांच्या वतीने केल्याने तसेच योग्य नियोजनामुळे भाविकाना काही वेळातच देवीचे दर्शन मिळत होते. कुठलीही दर्शन रांग खोळंबलेली दिसून येत नव्हती. ठिकठिकाणी लावलेल्या ४८ सीसी टीव्ही कॅमेरा सहाय्याने स्वागत कक्षामधून बाबू आंगणे, बाळा आंगणे यांच्याकडून वेळोवेळी सुचना देण्यात येत होत्या. सदर व्यवस्था आंगणे कुटुंबीय व रोहन व्हीडिओ कॉम्प्युटेक मुंबईचे अनंत आंगणे यांच्या वतीने करण्यात आली होती.
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…