Friday, May 9, 2025
Homeक्रीडाविराट कोहलीने केला सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम, हार्दिकने ओलांडला २०० बळींचा टप्पा

विराट कोहलीने केला सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम, हार्दिकने ओलांडला २०० बळींचा टप्पा

दुबई : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय क्रिकेटपटू होण्याचा मान विराट कोहलीने पटकावला आहे. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५७ झेल घेतले. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात नसीम शाहला झेलबाद केले. नसीम शाह १४ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर कोहलीकडे झेल देऊन परतला. हाच विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतलेला १५७ वा झेल ठरला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय क्रिकेटपटू

विराट कोहली (खेळत आहे) १५७ झेल
मोहम्मद अझरुद्दीन (निवृत्त) १५६ झेल
सचिन तेंडुलकर (निवृत्त) १४० झेल
राहुल द्रविड (निवृत्त) १२४ झेल
सुरेश रैना (निवृत्त) १०२ झेल

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम करणारा क्रिकेटपटू

महेला जयवर्धने, श्रीलंका (निवृत्त) २१८ झेल
रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया (निवृत्त) १६० झेल
विराट कोहली, भारत (खेळत आहे) १५७ झेल

हार्दिक पांड्याने घेतले २०२ आंतरराष्ट्रीय बळी

भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२ बळी घेतले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११ सामन्यांतील १९ डावांत गोलंदाजी करुन १७ बळी घेतले. तसेच त्याने ११४ टी २० सामन्यांतील १०२ डावांत गोलंदाजी करुन ९४ बळी घेतले. हार्दिकने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९१ सामन्यांतील ८५ डावांत गोलंदाजी करुन ८९ बळी घेतले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने ८ षटकांत ३१ धावा देत दोन बळी घेतले. त्याने बाबर आझमला २३ धावा केल्यानंतर यष्टीरक्षक केएल राहुलकरवी झेलबाद केले तर सौद शकीलला ६२ धावा केल्यानंतर अक्षर पटेलकरवी झेलबाद केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -