मुंबई: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे थोडे दुर्लक्षच होते. खाण्यापिण्यात योग्य ती काळजी न घेतल्याने अनेक आरोग्याच्या समस्या सतावतात. तसेच दिवसेंदिवस लोक अधिकच थकत असल्याची तक्रार करू लागले आहेत. त्यांना सतत थकवा जाणवत असतो.
जर संध्याकाळ होताच तुम्हालाही एनर्जी कमी होते असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला अशा ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत ज्या प्यायल्याने तुम्हाला एनर्जेटिक वाटू शकते. सोबतच हे ड्रिंक्सस आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मँगनीज, अँटीऑक्सिडंट आणि अमिनो अॅसिड असते. हे सर्व पोषकतत्व बॉडीला एनर्जी देतात. सोबतच तुम्हाला डिहायड्रेशनपासून वाचवतात.
आवळा, बीट आणि गाजरची स्मूदी तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देऊ शकते. गाजरमधील व्हिटामिन, फायबर आणि प्रोटीन शरीराच्या गरजा पूर्ण करते. बीटरूट नैसर्गिस केमिकल नायट्रेटचा चांगला स्त्रोत आहे. तसेच आवळ्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
ड्रायफ्रुट्स शेक प्यायल्याने यातील कार्बोहायड्रेट आणि नैसर्गिक साखर पुरेशी ऊर्जा देतात. सोबतच बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनक सारख्या समस्यांपासून बचाव करण्याचे काम करतात.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…