नवी दिल्ली : विक्रमची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाली असून मिशन पूर्ण झाले आहे.चंद्रयान-३च्या लँडरचा सुखद धक्का आहे. ही कामगिरी इस्त्रोचे मोठे यश मानले जाते. ऑगस्ट २०२३ मध्ये चंद्रयान-३ च्या लँडर विक्रमने सॉफ्ट लॅडिंग केली होती. त्यानंतर अंतराळाच्या इतिहासात नवीन आध्याय जोडला गेला होता. या मिशनमध्ये भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) वैज्ञानिकांना एका नवीन आव्हानांचा सामना करावा लागला होता. विक्रमकडे अजून काही प्रोपेलेंट शिल्लक होते. त्यावेळी इस्त्रोमधील काही शास्त्रज्ञांचे मत होते की ते असेच वाया जाऊ नये. त्याच वेळी काही शास्त्रज्ञ म्हणत होते की, अभियान आधीच यशस्वी झाले आहे आणि आता कोणत्याही अतिरिक्त प्रयोगांची गरज नाही. यामुळे दोन मतप्रवाहन निर्माण झाले.
शेवटी इस्त्रोने आपल्या योजनेत बदल केला. चंद्रावर विक्रम लँडरचा अप्रत्याशित ‘हॉप’ (उडी मारणे) प्रयोग करण्यात आला. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून ४० सेंटीमीटरवर उठला. त्यानंतर जवळपास ३०-४० सेंटीमीटर लांब जावून लँड झाला. विक्रम लँडरने मारल्या या उडीमुळे इस्त्रोचा वैज्ञानिकांना सुखद धक्का बसला. तसेच भविष्यासाठी चांगले संकेत मिळाले.
इस्त्रो प्रमुख व्ही. नारायणन हे सुद्धा त्यावेळी चंद्रयान – ३ मिशनमधील प्रमुख वैज्ञानिकांमध्ये होते. त्यांनी त्या दिवशाची आठवण करताना सांगितले की, लँडिंगच्या दिवशी खूप तणाव होता.परंतु, प्रोपेलेंट प्राणालीने पूर्ण काम केले.त्यानंतर चंद्रयान-३ चे लँडिंग झाले.हे मिशनचे मोठे यश होते. विशेष प्रोपेलेंटचा वापर करण्यासाठी त्यांनी इस्त्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ यांच्यासोबत चर्चा केली होती; परंतुत्यावेळी मिशनमध्ये सहभागी काही शास्त्रज्ञांनी या प्रयोगात रुची दाखवली आहे. याबाबत त्यांचे म्हणणे होते, विक्रमची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाली आहे.त्यामुळे मिशन पूर्ण झाले आहे.अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमधील व्याख्यानात बोलताना नारायणन यांनी ही आठवण सांगितली.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…