मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नवा इतिहास रचला आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
रोहितला इथवर पोहोचण्यासाठी १२ धावांची गरज होती. त्याने आपले हे लक्ष्य बांगलदेशविरुद्धच्या सामन्यात सहज पूर्ण केले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहितने ३६ बॉलवर ४१ धावा केल्या. यात ७ चौकारांचा समावेश होता.
रोहित या खास क्लबमध्ये सामील
रोहित शर्मा १०वा फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. सोबतच असे करणारा तो चौथा भारताचा फलंदाज आहे. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे.
1⃣1⃣,0⃣0⃣0⃣ ODI runs and counting for Rohit Sharma! 🙌🙌
He becomes the fourth Indian batter to achieve this feat! 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#TeamIndia | #BANvIND | #ChampionsTrophy | @ImRo45 pic.twitter.com/j01YfhxPEH
— BCCI (@BCCI) February 20, 2025
रोहित शर्मा एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमध्ये ११ हजार धावा पूर्ण करणारा दुसरा वेगवान फलंदाज आहे. रोहितने आपल्या २६१ वनडे डावामध्ये ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने सचिनला याबाबतीत मागे टाकले आहे. त्याने २७६ डावांत ११ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.