वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील कोंढले-खैरे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे रस्त्यावर वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. आपला जीव मुठीत घेऊन वाहनचालक येथून प्रवास करीत आहेत. शासनाने तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. या रस्त्याची प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
वाडा तालुक्यातील कोंढले – खैरे रस्ता हा ९ कि. मी.अंतराचा असून मोठ्या वर्दळीचा आहे. कोंढले विभागातील १५ ते २० गावपाड्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची सध्या चाळण झाली असून, गाव-पाड्यांतील नागरिकांना या खड्डेमय रस्त्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कोंढले-खैरे हा रस्ता अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. या रस्त्याची नव्याने दुरुस्ती होण्यासंदर्भात शासन स्तरावर अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. मात्र याबाबत कुठलीच दखल आजवर घेतली गेली नाही.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…