माणदेशातील ‘देशी’ उद्योजिका

Share

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे

लोकसंस्कृतीचे, लोककलेचे आणि ग्रामीण तसेच दुष्काळग्रस्त भागातील महिलांना, उद्योजिकांना शहरी बाजारपेठ मिळवून देणाऱ्या माणदेशी फाऊंडेशनचे मुंबईत सहावे पर्व ‘माणदेशी महोत्सव २०२’ पार पडले. १५० पेक्षा अधिक स्टॉलधारक तसेच ३०० पेक्षा अधिक महिलांचा समावेश असणाऱ्या महोत्सवाला मुंबई आणि मुंबई बाहेरच्या नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या महोत्सवात माणदेशातील काही महिला त्यांच्या कर्तृत्वाने लक्षणीय ठरल्या.

मुंबईच्या परेल भागातील नरे पार्कचं प्रांगण. इतर वेळेस मॉर्निंग वॉल्क, खेळांचे सराव, रात्रीच्या वेळेस विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेने गजबजलेल्या नरेपार्कचा नूर ५ ते ९ फेब्रुवारीपर्यंत काहीसा निराळाच होता. ग्रामीण भागातील लोककला, लोकसंस्कृती, बारा बलुतेदार पद्धतीचे प्रतिनिधित्व करणारे स्टॉल्स, अस्सल मातीच्या खाद्यसंस्कृतीची सफर घडविणाऱ्या सुगरणी, नंदीबैलवाले-पिंगळा-वासुदेव यांचे पारंपरिक खेळ यांनी नरेपार्कचं वातावरण गजबजून गेले होते. माणदेशी फाऊंडेशनच्या सहाव्या पर्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘माणदेशी महोत्सव २०२५’चा माहोल पाहण्यासाठी, खासकरून ग्रामीण महिला उद्योजिकांची भरारी पाहण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील नागरिकांनी तोबा गर्दी केली. माणदेशी फाऊंडेशनने १० लाख महिलांना आपल्या संस्थेत समाविष्ट केल्यामुळे उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला. या महिलांमध्ये केराबाई सरगर, कांताबाई साळुंखे, अनिता कुंभार, जयवंती भोये आणि जयवंती हिरकुडे यांचा सहभाग होता.

तसं पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, म्हसवड, कोरेगाव, पाटण हे भाग दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जातात. या दुष्काळग्रस्त भागाचा कायापालट करण्यासाठी गांधीवादी कार्यकर्त्या चेतना गाला-सिन्हा पुढे सरसावल्या. माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी या भागाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला. गेल्या दोन वर्षांत सातारा जिल्ह्याला ‘महाराष्ट्राचे फ्रुट बास्केट’ बनविण्यासाठी शासनाद्वारे निरनिराळे प्रयोग केले जात आहेत. पण पंधरा वर्षांपूर्वी हे प्रयत्न चेतना सिन्हा यांनी करण्यास सुरुवात केली. सातारच्या या दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी लखपती झाले आहेत. शेती तसेच शेतीपूरक, शेती संलग्न व्यवसायांमुळे महिला स्वयंसिद्ध झाल्या. संपूर्ण कुटुंबाचं गाडं हाकण्यासाठी परिपूर्ण झाल्या आहेत. या दुष्काळग्रस्त भागातील खेडूत महिलांनी चक्क विमानाने प्रवास केला आहे. ‘माणदेशी महोत्सव २०२५’मधल्या काही महत्त्वाच्या लक्षवेधी महिलांविषयाची ओळख झालीच पाहिजे.

केराबाई सरगर : रेडिओच्या इतिहासाचे पुनर्लेखन करायचे झाले तर केराबाई सरगर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. ६५ वर्षांच्या केराबाईंचे कर्तृत्व आहेच तसे. त्या भारतातील सर्वात वयोवृद्ध रेडिओ जॉकी आहेत. ‘माणदेशी तरंग ९०.०४’ या कम्युनिटी रेडिओवर केराबाई लोकगीतांचे कार्यक्रम सादर करतात. अक्षर ओळख नसणाऱ्या केराबाईंमाँ लोकगीतं म्हणण्याचा वारसा त्यांच्या आईकडून लाभला. “माझी आई जात्यावर दळण-कांडण करताना ओव्या गायची. आई जसं गायची ते मी अगदी तंतोतंत लक्षात ठेवून मीही गायला लागले. काही कामानिमित्त माझा मुलगा म्हसवडला गेला होता. तिथे त्याला ‘माणदेशी तरंग ९०.०४’ विषयी कळलं. मी मुलासोबत गेले. तिथे चेतना भाभीला भेटले. त्यांनी माझा आवाज ऐकला. ‘माणदेशी तरंग ९०.०४’ या माणदेशी रेडिओचा भाग झाले,’ केराबाई आपल्या रेडिओ जॉकीच्या प्रवास अभिमानाने कथन करतात. केराबाई ‘माणदेशी तरंग ९०.०४’ वाहिनीवर अभंग, ओव्या, गवळणी सादर करतात. अक्षर ओळख नसल्यामुळे केराबाईंची नातवंडे केराबाईंकडून पाठांतर करून घेतात. केराबाई आपल्या आवाजात, चालीत ‘माणदेशी तरंग ९०.०४’ वरून सादरीकरण करतात. “पहिली माझी ओवी गं, भीमाच्या लेखणीला… विद्रोहाचा विचार करून शहाणं केलं लोकांना” ही केराबाईंच्या आवाजातील संविधानावरची ओवी विशेष लोकप्रिय आहे. यंदाच्या ‘माणदेशी महोत्सव २०२५’मध्ये दुष्काळाचं वर्णन करणारं “तुझ्या वाटेवरी डोळा…” ही ओवी विशेष गाजली. यंदाच्या महोत्सवात संगीतकार अवधुत गुप्ते, दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनीही केराबाईंच्या कलेचे विशेष कौतुक केलं.

कांताबाई साळुंखे : “माणदेशी बँक”च्या फाऊंडर मेम्बर असणाऱ्या कांताबाई यांचाही ‘माणदेशी महोत्सव २०२५; मध्ये सहभाग होता. ७४ वर्षांच्या कांताबाई लोखंड आणि बिडाच्या वस्तू बनवतात. त्यात विळी, कोयते, कढई, चाकू, सुरे, तवा ही स्वयंपाक घरातील साधने आणि शेतीच्या अवजारांची त्या निर्मिती करतात. माणदेशी फाऊंडेशन सोबतच्या आपल्या नात्यावर भाष्य करताना कांताबाई सांगतात, “आज मी जी काही आहे, ती माणदेशी फाऊंडेशनमुळे आहे. रोज भंगारातून लोखंड जमा करून आणून त्यापासून वस्तू बनविण्याच्या माझ्या व्यवसायाला शहरी भागातील ग्राहक मिळवून देण्याचं काम माणदेशी फाऊंडेशनने केले आहे. या व्यवसायावर माझी ७ मुले मोठी केली. मुलींची लग्न केली.” यंदाच्या माणदेशी महोत्सवात कांताबाईंनी १५० पेक्षा जास्त वस्तूंची विक्री केली आहे.

अनिता कुंभार : महोत्सवात मातीच्या वस्तू बनविण्याचेही विविध स्टॉल्स होते. पण दखल घेण्याजोगा होता तो अनिता कुंभार यांचा स्टॉल. अनिता कुंभार यांच्या स्टॉलवर स्वयंपाकासाठी उपयोगी पडणारी विविध मातीची भांडी उपलब्ध होतीच; पण शिवाय मातीच्या शोभेच्या वस्तू जसे की, मुखवटे, शोभेच्या वस्तूसुद्धा उपलब्ध होत्या. अनिता ताईंच्या कलेला शहरी ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. “मला कलेची आवड आहे. मातीकामाचं प्रशिक्षण मी घेतलं. त्यानंतर वस्तू घडवू लागले. पण वस्तूंची विक्री होत नव्हती. जेव्हा माणदेशी फाऊंडेशनशी जोडले गेले तेव्हा वस्तूंची विक्री झालीच. शिवाय कलेलाही वेगळी ओळख लाभली. त्यानंतर माणदेशी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेऊ लागले. जशी वस्तूंची मागणी वाढू लागली तसे मी बचतगटांच्या महिलांना कुंभारकामाचे प्रशिक्षण देण्यात सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमची कला आज महाराष्ट्राबाहेरही पोहोचली आहे. याचे श्रेय फक्त आणि फक्त माणदेशी फाऊंडेशनला आहे,” अनिता कुंभार अभिमानाने सांगत होत्या.

जयवंती भोये आणि जयवंती हिरकुडे : “महालक्ष्मी गृहउद्योग”अंतर्गत जयवंती भोये आणि जयवंती हिरकुडे यांनी आयुर्वेदिक निर्गुडी तेल बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. निर्गुडी, कडुलिंब, निरगिरी, जास्वंद, अडुळसा इत्यादी वनस्पती तसेच कापूर, तिळाचे व राईचे तेल इत्यादी घटकांपासून बनवलेले आयुर्वेदिक निर्गुडी तेल कमी कालावधीत लोकप्रिय झाले. या तेलाचा उपयोग कंबरदुखी, पाठदुखी, हातपायांची सूज, सांधेदुखी या आजारांवर उपयुक्त आहे. “महालक्ष्मी गृहउद्योग’अंतर्गत तयार झालेले तेल महाराष्ट्राबाहेर पोहोचले आहे. “आमच्या सारख्या दऱ्या-खोऱ्यात वावरणाऱ्या आदिवासींना माणदेशी फाऊंडेशनने स्वतःची ओळख दिली. फक्त ओळखच नाही तर विमान प्रवासही घडवून आणला. परदेशी पाहुण्यांच्या भेटी घडवून दिल्या. आमची उत्पादने थेट भारताबाहेर पोहोचवली. माणदेशी फाऊंडेशनचे आभार.”

ही प्रतिक्रिया देताना जयवंती भोये आणि जयवंती हिरकुडे या दोघींच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान झळकत होते.
केराबाई सरगर, कांताबाई साळुंखे, अनिता कुंभार, जयवंती भोये आणि जयवंती हिरकुडे यांच्यासारख्या स्वतःला सिद्ध करण्याऱ्या महिला ‘माणदेशी महोत्सव २०२५’मध्ये पाहायला मिळाल्या. स्वत:ला सिद्ध करीत, आपले कुटुंब तसेच समाजासमोर आदर्श निर्माण करीत उद्योगिनी होण्याचा त्यांचा प्रवास खूप काही शिकवून जातो. त्यामुळेच तर त्या लेडी बॉस ठरलेल्या आहेत.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

4 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

4 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

4 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

5 hours ago