रत्नागिरी : प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याला जाण्याकरिता कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. उडुपी ते प्रयागराज जंक्शन आणि परत या मार्गावर ही गाडी धावेल. त्याचा तपशील असा – गाडी क्र. ०११९२ उडुपी टुंडला जंक्शन गाडी सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून सुटेल.
ही गाडी टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी (बुधवार, १९ फेब्रुवारी) दुपारी १ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला गाडी क्र. ०११९१ गाडी तुंडला जंक्शन येथून गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी शनिवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी उडुपीला पोहोचेल.
ही गाडी बारकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड, बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरीया, मदनीक, माणिकपूर, जं. प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन येथे थांबेल.गाडीला एकूण २० डबे असतील. त्यातील 2 टायर एसी १ कोच, 3 टायर एसी ५ कोच, -स्लीपर १० कोच, जनरल – २ आणि एसएलआर २ कोच असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…