कोलकाता (वृत्तसंस्था): देशासाठी जबाबदार असलेला समाज हा हिंदू आहे.त्यामुळेच संघाचे उद्दिष्ट फक्त हिंदू समाजाला एकत्र करणे आहे, असे ठाम मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालमध्ये १० दिवसांचा दौरा केला. त्याच दौऱ्याची रविवारी जाहीर सभेने सांगता झाली आहे. या सभेला संबोधित भागवत पुढे म्हणाले की,देशभरात १ लाख ३० हजारांहून अधिक स्वयंसेवक आहेत. तो कोणाकडूनही पैसे घेत नाही, तो स्वतः काम करतो. म्हणूनच आम्ही म्हणतोय की, आम्ही हे प्रसिद्ध होण्यासाठी करत नाही आहोत, तर भारताच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी आम्ही हे करत आहोत.
पुढे ते म्हणाले,”भारताला एक निसर्ग आहे आणि ज्यांना वाटले की ते त्या निसर्गासोबत राहू शकत नाहीत. त्यांनी स्वतःचा वेगळा देश निर्माण केला. हिंदू जगाच्या विविधतेचा स्वीकार करून पुढे जातात.आजकाल आपण विविधतेत एकता म्हणतो, हिंदूंचा असा विश्वास आहे की एकतेत विविधता आहे.”
रामायणातील दाखले देत संघप्रमुख म्हणाले की,”इथे राजे आणि सम्राटांची आठवण कोणालाच नाही पण तो राजा आठवतो ज्याने आपल्या वडिलांसाठी १४ वर्षे वनवासात घालवला आणि ज्याने आपल्या भावाचे चप्पल ठेवले आणि परतल्यावर आपल्या भावाला राज्य दिले.
मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालच्या दहा दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी संघाच्या अनेक नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी संघाचे संघटन बळकट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मोहन भागवत यांनी आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचीही भेट घेतली. दरम्यान भागवत यांचा हा पश्चिम बंगाल दौरा म्हत्त्वाचा मानला जात आहे, कारण येत्या काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर शेजारील देश बांगलादेशशी संबंध बिघडलेले आहेत.त्यामुळे बंगालच्या सीमावर्ती भागात तणाव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…