नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याच्या कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स कंपनीत स्फोट झाला. यानंतर कंपनीत आग लागली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. कंपनीचा काही भाग जळून खाक झाला. रविवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. स्फोटाचे हादरे सुमारे २० किमी.परिसरात जाणवले. कंपनीच्या एका भागातील छत कामगारांच्या अंगावर कोसळले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे पथक, वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. स्फोट प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजेलेले नाही.
नागपूरच्या कंपनीत स्फोट, दोघांचा मृत्यू
