मुंबई : प्रत्येक रविवारी मुंबई लोकलबाबत (Mumbai Local) तांत्रिक बिघाड दुरुस्तीची किंवा इतर कामे हाती घेतली जातात. त्यामुळे रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. यावेळी काही रेल्वेगाड्या रद्द केल्या जात असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचे दिसून येते. अशातच उद्या रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. उद्या (दि.१६) रोजी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी उद्या रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या मध्य, पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १० वाजून ५५ मिनिटं ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांच्या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
ब्लॉकच्या वेळांमध्ये (CSMT) सीएसएमटी – विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल, जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या वेळेत सर्व लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढील स्थानकावर लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
पश्चिम रेल्वेवर बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत गोरेगाव – बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. इतकंच नव्हे, तर अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेतला जाईल. सकाळी ११ वाजून १० मिनिट ते दुपारी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक लागू असणार आहे. यादरम्यान सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशीच्या अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येतील. ब्लॉक काळात प्रवाशांसाठी सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी मार्गांवर मात्र विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ब्लॉक काळात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करु शकतील, असेही रेल्वे विभागाने सांगितले आहे.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…