रत्नागिरी : रत्नागिरी येथील नाचणे रोडवरील पॉवर हाऊसजवळील श्री गजानन महाराज मंदिराच्या आवारात नवग्रह मंदिर नव्याने बांधण्यात आले असून येत्या शनिवारी, दि. १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत श्री गजानन महाराज मंदिरात प्रकटदिन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री गजानन महाराज (शेगांव) स्मृतीमंदिर समितीचे संस्थापक अध्यक्ष म. वा. देसाई यांनी दिली.
नाचणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात आज आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. यावेळी प्रवीण ऊर्फ अण्णा कवितके उपस्थित होते. माहिती देताना श्री. देसाई म्हणाले, नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच गजानन महाराज प्रकट दिन सोहळा या निमित्ताने १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समितीतील महिलांच्या हस्ते नवग्रहांवर जलस्नानाच्या मोठ्या कार्यक्रमाने होणार आहे. नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्या निमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…