कटक : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी २० सामन्यांची मालिका भारताने ४ – १ अशी जिंकली. यानंतर सुरू झालेल्या भारत – इंग्लंड एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने चार गडी राखून जिंकला. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना झाला आहे आणि दुसरा सामना रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून कटक येथे सुरू होणार आहे. कटकच्या बाराबती स्टेडियम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर आणि थेट प्रक्षेपण अर्थात लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर होणार आहे.
मालिकेत भारताने १ – ० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे कटकमध्ये जिंकून टीम इंडियाला मालिका २ – ० अशी जिंकण्याची संधी आहे.
कटकच्या सामन्यासाठी अंतिम संघ या खेळाडूंमधून निवडणार
भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , केएल राहुल (यष्टीरक्षक) , यशस्वी जयस्वाल , शुभमन गिल , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल , हार्दिक पांड्या , रवींद्र जडेजा , हर्षित राणा , कुलदीप यादव , मोहम्मद शमी , वरुण चक्रवर्ती , वॉशिंगटन सुंदर , विराट कोहली , रिषभ पंत, अर्शदीप सिंग
इंग्लंड : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक) , जोस बटलर (कर्णधार) , बेन डकेट , जो रूट , हॅरी ब्रूक , जेकब बेथेल , लियाम लिव्हिंगस्टोन , ब्रायडन कार्स , आदिल रशीद , जोफ्रा आर्चर , साकिब महमूद , गस अॅटकिन्सन , मार्क वूड , जेमी ओव्हरटन , जेमी स्मिथ
भारत विरुद्ध इंग्लंड, एकदिवसीय सामन्यांची मालिका, सर्व सामने दुपारी दीड वाजल्यापासून सुरू
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…