सचिन धानजी, मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी सन २०२५-२६चा तबबल ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, मागील सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिका अस्तित्वात आली तेव्हापासून म्हणजे सन २०१७- १८ च्या तुलने आगामी अर्थसंकल्पाचा आकडा तब्बल ५० हजार कोटींनी वाढल्याचे दिसून येत आहे. सन २०१७ -१८ रोजी महापालिकेने २५,१४१.५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता.तर तब्बल सात वर्षांनी अर्थसंकल्पाचा आकडा ५० हजारांनी फुगवून सुमारे ७४ हजार कोटींवर जावून पोहोचल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेचा २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महापालिकेचा अर्थसंकल्प सन २०१६-१७ मध्ये ३७०५२.५२ कोटी रुपये एवढा होता, तर त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिका प्रस्थापित झाल्यानंतर तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पाचा आकडा तब्बल १२ हजार कोटींनी कमी करत सन २०१७ -१८मध्ये २५१४१.५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर अर्थसंकल्पाचा आकडा वाढतच जात असून त्यानंतर अजोय मेहता याच्या कारकिर्दीत अर्थसंकल्पाचा आकडा ३० हजार ६९२ कोटी रुपयांपर्यंत तर त्यानंतर २०२०-२१मध्ये तत्कालिन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी तीन हजार कोटींनी वाढ करत ३३,४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे २०१७-१८ ते २०२०- २१ या चार वर्षांत अर्थसंकल्पाचा आकडा २५ हजार कोटींवरून ३३ हजार कोटींवर म्हणजे तब्बल ८ हजार कोटींनी अर्थसंकल्पाचा आकडा वाढला गेला होता.
सन २०२१-२२मध्ये तत्कालिन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी थेट मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत सहा हजार कोटींनी वाढ करत ३९,०३८ कोटींचा अर्थसंकल्प मांडला.त्यानंतर पुढील आर्थिक वर्षांत सात हजार कोटींनी आणि त्यानंतर पुन्हा साडेसहा हजार कोटींनी तसेच त्यापुढील वर्षांत सात वर्षांनी वाढवत सन २०२४- २५ या वर्षांत ५९,९०० कोटींचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात ६५ हजार कोटींचा दाखवून तो ६४ हजार कोटी रुपयांनी सुधारीत केला. आता आगामी सन २०२५- २६ या वर्षांत सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत १४ हजार कोटींनी आणि सुधारीत अर्थसंकल्पाच्या तुलने दहा हजार कोटींनी अर्थसंकल्पाचा आकडा वाढला गेला. सन २०१७- १८च्या तुलनेत चालू अर्थसंकल्पाचा आकडा पाहता सात वर्षांत अर्थसंकल्पात ५० हजार कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
अर्थसंकल्पाची आकडेवारी
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…