Share

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी एका टप्प्यात मतदान झाले. मतमोजणी आज (शनिवार ८ फेब्रुवारी २०२५) होत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल बघता, भारतीय जनता पार्टी ४० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. यामुळे ‘दिल्लीचा कल, फुलले भाजपाचे कमळ’ असे म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. आम आदमी पक्षाचे अनेक उमेदवार पिछाडीवर आहेत. पिछाडीवर असलेल्यांमध्ये ‘आप’चे प्रमुख नेते पण आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल (निवडणूक आयोगाचे निकालाचे पान)

दिल्लीत भाजपाची सत्ता आली तर दिल्लीकरांना डबल इंजिन सरकारचा फायदा होईल. दिल्लीतील वाहतूक समस्या, प्रदूषण, शिक्षण, रोजगार आदी समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर अजून निकाल जाहीर झालेला नाही. थोडा वेळ थांबा, अशी प्रतिक्रिया ‘आप’चे कार्यकर्ते देत आहेत.

याआधी दिल्लीत मतदानाच्यावेळी गडबड झाल्याची दावा आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसने केला. पण दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला अद्याप ठोस पुरावे सादर केलेले नाही. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतल्याचे जाहीर केले आणि योग्य शब्दात स्पष्टीकरण लवकरच देणार असल्याचे जाहीर केले. मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक कशी योग्य प्रकारे झाली, हे स्पष्ट करणारी आकडेवारी देऊ, असे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. पण आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा आरडाओरडा म्हणून पराभवाची कारणे सांगण्याची पूर्वतयारी असल्याची प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे.

Recent Posts

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

4 minutes ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

19 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

31 minutes ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

4 hours ago