श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे नियंत्रण रेषेवरुन काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय लष्कराने ठार केले. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीममधील जवान आणि अतिरेकी यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पूंछ मधील कृष्णा खोऱ्याजवळ घडली.पाकिस्तानी घुसखोरांची भारतीय सैन्याच्या आघाडीच्या चौकीवर हल्ला करण्याची योजना होती. भारतीय सैन्याला याची माहिती मिळाली आणि त्यांनी कारवाई करुन कट उधळून लावला. घुसखोरीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या सात जणांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचे (बॅट) तीन ते चार सदस्यही ठार झाले आहेत. ही टीम सीमापार ऑपरेशन्समध्ये तरबेज असून या पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला आहे.या कारवाईत मारले गेलेले अतिरेकी अल बद्र ग्रुपचे सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतचे सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडवू असे सांगितले होते. यानंतर हा घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…