प्रयागराज : प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ मेळाव्याला भारतासह जगभरातील भक्तांनी खास हजेरी लावली आहे.अशातच निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने हिंदू धर्मात पवित्र मनाला जाणाऱ्या महाकुंभ मेळ्यात जाऊन पवित्र स्नान करून आशीर्वाद घेतेले आहेत. स्वप्नील हा कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देताना दिसतो. आता अश्यातच त्याने महाकुंभ मेळाला हजेरी लावून चाहत्यांचे मन जिंकले आहे.
स्वप्नील जोशीने त्याचा सोशल मीडिया वरून या महाकुंभ मेळ्याची खास झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. त्रिवेणी संगम इथे जाऊन स्वप्नीलने खास स्नान केलं आणि भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या खास सोहळ्याची झलक त्याने या व्हिडिओ मधून दाखवली आहे. स्वप्नील हा खास अनुभव शेअर करत म्हणाला “हा माझा २०२५ मधला सगळ्यात अविस्मरणीय अनुभव आहे. महाकुंभ मेळ्यात उपस्थित राहून पवित्र स्नान करण्याचा योग आला खूप सकारात्मक ऊर्जा अनुभवून डोळ्यातून आपसूक आनंदअश्रू आले. या अद्भुत संगमाचे साक्षीदार होणं दैवी आशीर्वाद वाटतो”. असे त्याने म्हटले आहे. स्वप्नील कायम चर्चेत राहणारा अभिनेता असला तरी त्याची अध्यात्मिक बाजू देखील तितकीच खास आहे.
स्वप्नील कायम वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करताना दिसतो आणि अश्यातच चित्रपटाच्या कथे सोबत तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका तेवढ्याच ताकदीने साकारून त्यांना योग्य तो न्याय देतो. जिलबी, चिकी चिकी बुबूम बुम नंतर स्वप्नील सुशीला – सुजीत, शुभचिंतक या चित्रपटात देखील स्वप्नील जोशी अनोख्या भूमिकेत दिसणार आहे आणि याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…