PM Modi : ‘सबका साथ, सबका विकास’ काँग्रेसच्या कल्पनेपलीकडचे; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत विरोधकांवर हल्लाबोल

Share

नवी दिल्ली : सबका साथ, सबका विकास, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच देशाने आपल्या सर्वांना येथे बसण्याची संधी दिली आहे; पण काँग्रेसचा विचार केला तर, त्यांच्याकडून ‘सबका साथ, सबका विकास’ अशी अपेक्षा करणे ही मोठी चूक ठरेल असे मला वाटते. हे त्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे. ते त्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडे आहे. कारण एवढा मोठा पक्ष एकाच कुटुंबाला समर्पित झाला आहे. त्याच्यासाठी, सर्वांचा पाठिंबा आणि सर्वांचा विकास शक्य नाही,” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी राज्यसभेत विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात प्रत्येक गोष्टीत तुष्टीकरण होते. खोटेपणा, कपट, भ्रष्टाचार, घराणेशाही व तुष्टीकरण यांचे मिश्रण असणारे राजकारणाचे मॉडेल काँग्रेसने तयार केले आहे. अशा प्रकारचे मिश्रण असते तिथे सर्वांचे सहकार्य व सर्वांचा विकास होऊ शकत नाही. काँग्रेस मॉडेलमध्ये कुटुंब प्रथम सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांची धोरणे, मार्ग, भाषण आणि वर्तन फक्त त्या एकाच गोष्टीला हाताळण्यातच खर्ची पडले आहे, असा टोली त्यांनी यावेळी लगावला.

आमचे विकासाचे मॉडेल ‘राष्ट्र प्रथम’

  • २०१४ नंतर देशाने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. मी देशातील जनतेचा आभारी आहे, त्यांनी आम्हाला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे.
  • ‘राष्ट्र प्रथम’ हे आमचे विकासाचे मॉडेल आहे. देशातील जनतेने आमच्या विकास मॉडेलची चाचणी घेतली आहे, ते समजून घेतले आहे आणि पाठिंबा दिला आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना परत घेणे ही देशाची जबाबदारी

  • अमेरिकेने बेकायदा प्रवाशांना भारतात परत पाठवल्यानंतर पहिल्यांदाच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना परत घेणे ही देशाची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.
  • बुधवारीच अमेरिकन लष्कराच्या विमानातून पायात साखळ्या आणि हातात बेड्या घालून या प्रवाशांना मायदेशी पाठवण्यात आले. या सर्वांना अमेरिकेने बेकायदा प्रवाशी ठरवले आहे. भारतात परत पाठवण्याच्या पद्धतीवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
  • राज्यसभेत बोलताना एस जयशंकर म्हणाले की, जर एखाद्या देशाचे नागरिक परदेशात बेकायदेशीर वास्तव्य करत असतील तर त्यांना परत घेणे ही सर्व देशांची जबाबदारी असते. डिपोर्टेशनची प्रकिया नवी नाही. अमेरिकन लष्कराच्या विमानातून १०४ भारतीय बुधवारी अमृतसरमध्ये उतरले.
  • अमेरिकेकडून सुरू असलेले डिपोर्टेशनचे काम इमिग्रेशन अँड कस्टम इन्फोर्समेंटकडून केलं जात आहे. त्यांच्या एसओपीनुसारच हे काम सुरू आहे. यात साखळदंड घातल्याचे सांगितले जात आहे.

आम्हाला इमिग्रेशन अँड कस्टम इन्फोर्समेंटने सांगितले की, महिला आणि मुलांना बांधले नव्हते. आम्ही अमेरिकन सरकारशी बोलत आहोत. यापुढे डिपोर्शन करताना अशा पद्धतीची वागणूक दिली जाऊ नये यासाठी प्रयत्न करू असंही जयशंकर म्हणाले.

Tags: pm modi

Recent Posts

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…

14 minutes ago

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

1 hour ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

1 hour ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

2 hours ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

2 hours ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

2 hours ago