मुंबई : जवाहरलाल नेहरू बंदरावरुन (जेएनपीए) येणारी आणि जाणारी मालवाहक वाहने, तीन महामार्गांकडे जाणारी वाहतूक, मुंबई, ठाणे, कल्याणला जोडणारे रस्ते, यामुळे कळंबोली हे मुंबईचे प्रवेशद्वार कायम वाहतूक कोंडीत असते. ही कोंडी ७५५ कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या ‘डबलडेकर इंटरचेंजद्वारे’ फोडली जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अर्थात एनएचएआयने यासाठीचे नियोजन सुरू केले आहे.
कळंबोली जंक्शनला शीव-पनवेल रस्ता येऊन मिळतो. हा रस्ता पुढे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो. दुसरा रस्ता शीळफाटा, कल्याण दिशेने येऊन जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने पुण्याकडे जातो. पनवेलमार्गे गोव्याच्या दिशेने जाणारा राष्ट्रीय महामार्ग याच जंक्शनवरून पुढे जातो. जवाहरलाल नेहरू बंदरासाठीची वाहतूकही याच जंक्शनवरून शीळ-कल्याण किंवा पनवेल-शीव रस्त्याने ये-जा करत असते. यामुळे कळंबोलीत अनेकदा वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी ‘डबलडेकर इंटरचेंज’ उभारण्याची योजना आहे.
‘डबलडेकर इंटरचेंज’मध्ये जमिनीवरील वाहतूक पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावरील उड्डाणपुलाद्वारे होणार आहे. शीळफाटा-कल्याणकडून येऊन नवी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी भूमिगत रस्ता असेल. याच भूमिगत रस्त्याच्या बाहेर पडून जुना मुंबई-पुणे महामार्गही गाठता येईल. मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक पहिल्या मजल्यावरून असेल. याच पहिल्या मजल्यावर एक फाटा फुटेल व तो रस्ता पुढे ‘जेएनपीए’च्या दिशेने खाली उतरेल. ज्यांना मुंबई-पुणे जुना महामार्ग किंवा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जायचे आहे, त्यांनाही पहिल्या मजल्याचाच वापर करावा लागेल. शीळफाटा-कल्याण ते गोवा महामार्ग (पनवेल), शीळफाटा-कल्याण ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, शीळफाटा-कल्याण ते गोवा महामार्ग व शीळफाटा-कल्याण ते जेएनपीए जाणाऱ्यांसाठी दुसऱ्या मजल्यावरून रस्ता असेल. या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली असून प्राथमिक कामे सुरू झाली आहेत.
कळंबोली जंक्शनचा ‘डबलडेकर इंटरचेंज’द्वारे विकास साधताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने येऊन ‘जेएनपीए’कडे किंवा गोवा महामार्गाकडे जाण्यासाठी जंक्शनच्या वायव्य दिशेकडील ८८८७.४० चौरस मीटर जमिनीचे भूसंपादन आवश्यक आहे. ही जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. यामुळे सिडकोच्या मदतीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…