नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांसाठी ‘अच्छे दिन’ आणणार की नाही यावरुन तर्कवितर्क सुरू आहेत.
तज्ज्ञांच्या मते, देशातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी नवी करप्रणाली (Nex Tax Regime) स्वीकारली आहे. यामुळे जुनी करप्रणाली रद्द करुन सर्वांसाठी नवी करप्रणाली लागू केली जाणार का याचा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पातून जाहीर केला जाईल. आयकरात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवली जाणार की नाही या प्रश्नाचे उत्तर पण यंदाच्या अर्थसंकल्पातून मिळेल.
जीएसटी बाबतचे निर्णय जीएसटी काउन्सिलमध्ये होतात. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या काउन्सिलमध्ये देशातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री आहेत. यामुळे जीएसटीबाबत अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणेची शक्यता कमी आहे. पण भारतातील निर्मिती उद्योगाला चालना मिळावी, कारखानदारी वाढावी यासाठी काही घोषणा अर्थसंकल्पाद्वारे केल्या जाण्याची शक्यता आहे. पायाभूत सुविधांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. संरक्षण क्षेत्र, कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण यासाठी किती निधी दिला जाणार याचे उत्तर अर्थसंकल्पातच मिळेल.
जाहीर झालेल्या सरकारी कार्यक्रमानुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्याची प्रक्रिया शनिवार १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. अर्थसंकल्पाद्वारे नव्या आर्थिक वर्षासाठी (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) केंद्र सरकारचा प्रस्तावित खर्च आणि महसुली उत्पन्नाचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. मागील चार केंद्रीय अर्थसंकल्प आणि एका अंतरिम अर्थसंकल्पाप्रमाणेच यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्पही पेपरलेस असेल.
अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे बीएसई आणि एनएसई हे दोन्ही शेअर बाजार शनिवार १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० या वेळेत नेहमीप्रमाणे त्यांचे आर्थिक व्यवहार सुरू ठेवणार आहेत. याआधी १ फेब्रुवारी २०२० आणि २८ फेब्रुवारी २०१५ रोजी शनिवारी अर्थसंकल्प सादर झाले होते. या दोन्ही वेळी पण बीएसई आणि एनएसई हे दोन्ही शेअर बाजार शनिवार असूनही आर्थिक व्यवहार करत होते.
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…