नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवार ३१ जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात परंपरेनुसार राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होईल. संसदेच्या संयुक्त सभेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सकाळी अकरा वाजता संबोधणार आहेत. या अधिवेशनात शनिवार १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेच्या कामकाजाला सुरुवात होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष २०२४ – २५ चा भारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey) सादर करणार आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १६ विधेयके सादर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजात अडथळे निर्माण केले तर नियोजीत विधेयकांपैकी काही विधेयके सादर करण्याची प्रक्रिया पुढच्या अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग १३ फेब्रुवारी रोजी संपेल आणि दुसरा भाग १० मार्च रोजी सुरू होणार आहे. अधिवेशनाची सांगता ४ एप्रिल रोजी करण्याचे नियोजन आहे. विरोधकांकडून सहकार्य मिळाले तर ठरल्याप्रमाणे सुटीचे दिवस वगळता ३१ जानेवारी ते ४ एप्रिल या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज होणार आहे.
आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय ?
पहिले आर्थिक सर्वेक्षण १९५०-५१ मध्ये सादर झाले. आधी आर्थिक सर्वेक्षण हे अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांचा भाग होते. पण १९६० पासून आर्थिक सर्वेक्षण हे अर्थसंकल्प सादर होण्याच्या आदल्या दिवशी करण्याची परंपरा सुरू झाली. आर्थिक सर्वेक्षण हा आर्थिक विषयाशी संबंधित दस्तऐवज आहे. यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात आर्थिक वर्ष २०२४ – २५ मधील भारताच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाईल. सरकारला आर्थिक सर्वेक्षणातून एका वर्षातील आर्थिक कामगिरीचे तपशीलवार विश्लेषण आणि भविष्यातील संभाव्य धोरणांसाठी सूचना मिळतात. आर्थिक सर्वेक्षणाच्या पहिल्या भागात अर्थव्यवस्थेच्या कामगिरी, आर्थिक परिस्थिती आणि राजकोषीय धोरणांशी संबंधित विषयांशी निगडीत आकडेवारी असते. शिक्षण, गरिबी, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि मानवी स्रोतांशी संबंधित सामाजिक-आर्थिक पैलूंचे विश्लेषण आर्थिक सर्वेक्षणाच्या दुसऱ्या भागात असते. आर्थिक धोरणे सुधारणे आणि नवी आर्थिक धोरणे तयार करणे या प्रक्रियेला सहाय्यक म्हणून आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार केला जातो.
यंदाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आला आहे. प्रामुख्याने अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात गुंतले होते.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…