नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejrival) यांच्या यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याच्या विधानाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात आयोगाने केजरीवालांना उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पुरावा सादर करण्यास सांगितला आहे. तसेच समाधानकारक उत्तर न दिल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आलाय.
निवडणूक आयोगाने केजरीवाल यांनी केलेल्या विधानांवर तथ्यात्मक आणि कायदेशीर बाबींवर पुराव्यांसह उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुरावे सादर केल्यास आयोग प्रकरणाची तपासणी करू शकेल आणि योग्य कारवाई करू शकेल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच अशा आरोपांमुळे शेजारील राज्यांमधील रहिवाशांमध्ये वैर निर्माण होणे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.यमुनेत विष कोणी मिसळले ? यमुनेत कोणते विष मिसळले होते? कोणत्या अभियंत्याने विष शोधून काढले ? विष कुठे मिसळले होते ? पाण्यात विषाचा प्रसार कसा रोखला गेला ?
अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, भूपेंद्र यादव आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यांची भेट घेतली होती. लोकांमध्ये “दहशत” निर्माण केल्याबद्दल नेत्याने त्यांचे आरोप मागे घ्यावेत आणि माफी मागावी, अशी मागणही भाजपने केली होती.
आपने हरियाणातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जाणीवपूर्वक यमुनेत औद्योगिक कचरा टाकत असल्याचा आरोप केला होता. केजरीवाल यांनी भाजप नदीत ‘विष मिसळून’ लोकांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यापूर्वी, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना लिहिलेल्या पत्रात, नायब उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आम आदमी पक्षाने यमुना नदीला विषबाधा केल्याच्या अलिकडच्या आरोपावर तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. पाणी विषबाधा आणि नरसंहाराचे दिशाभूल करणारे आरोप दिशाभूल करणारे आहेत. लोक. हे चिथावणी देण्यासारखे आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करण्यासारखे आहे, असे त्यांनी म्हटले होते.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…