मुंबई : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. मात्र ट्रेलरमधल्या एका सीन वरून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आता हा आक्षेपार्ह सिन चित्रपटातून काढून टाकल्याची माहिती मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळत नृत्य करत असताना या ट्रेलरमध्ये दाखवले होते. विविध संघटनांनी याविरोधात आक्षेप घेत आंदोलन करत हा सिन चित्रपटातून काढावा अशी मागणी केली होती.ती मागणी अखेर पूर्ण झाली आहे. याबाबत मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी छत्रपती उदयन राजे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी स्वत: काल निर्मात्यांना फोन केला होता. आजची त्यातली सकारात्मक बाजू अशी आहे, तो जो नाचण्याचा पार्ट होता तो त्यांनी काढून टाकला आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे. तसेच छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी स्वतः देखील हा सीन हटवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी दोन दिवसापूर्वी या संदर्भात भूमिका मांडली होती. सामंत यांनी छावा चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!” अशी कठोर भूमिका मांडली होती. ‘छावा’ या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. छावा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला सर्वत्र रिलीज होणार आहे.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…