मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. शशांक दुसऱ्यांदा बाबा झाला असून त्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. शशांकने आपल्या सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्याचसोबत शशांकने लेकीचं नावं सुद्धा सांगितले आहे. शशांकने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. “खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झालं. घरी लक्ष्मी आली”, असं शशांक व्हिडिओत म्हणत आहे. या व्हिडिओतून शशांकने लेकीचं नावही जाहीर केलं आहे. शशांकने त्याच्या लाडक्या लेकीचं नाव राधा असं ठेवलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरीही शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने एक फोटो टाकला आहे. यामध्ये “हम दो हमारे दो” असं त्याने म्हटलं आहे. शशांक केतकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेतून शशांकला प्रसिद्धी मिळाली. त्याने अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. शशांकने २०१७ साली प्रियांका ढवळेसोबत लग्न करत संसार थाटला. त्यांना ऋग्वेद हा मुलगा आहे. आता मुलगी झाल्याने शशांक आणि प्रियांका आनंदी आहेत.
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…