अमरावती : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ छाटायला नको तर जिभेला चटके द्यायला पाहिजे असे वादग्रस्त विधान करणारे भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना लक्ष केले आहे. ‘पप्पू टप्पू उडान टप्पू’ म्हणत बोंडे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.
खासदार डॉ. अनिल बोंडे पत्नी डॉ. वसुधा बोंडे यांच्यासोबत अंदमान निकोबार बेटाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारच्या हिंदी राजभाषा समितीच्या निमित्याने त्यांचा हा दौरा होत आहे. दरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सेल्युलर तुरुंगातील काळकोठडीला भेट दिली. ज्या ठिकाणी सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगावी लागली त्या कोठडीत जाऊन अनिल बोंडे यांनी सावरकरांचे स्मरण केले. त्या कोठडीत काही काळ ध्यानही केले. तसेच सावरकरांच्या पावन स्मृतीला आपण नमन करत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
दहा वर्षापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या कोठडीत वास्तव्य केले. जी माणसे वीर सावरकरांवर टीका करतात, त्यांनी या कोठडीत एकदा येऊन बधावे. सात दिवस राहून पाहावे. इथला कोल्हू चालवावा. तुरुंगातले कपडे घालावे त्यावेळी काँग्रेस आणि समस्त टीकाकारांना सावरकरांचे देशासाठी काय बलिदान होते, त्यांनी देशासाठी काय त्याग केला, हे लक्षात आल्याशिवाय राहणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. सोबतच सावरकरांचा त्याग अंदमानात येऊन अनुभवण्याचाही सल्ला डॉ. बोंडे यांनी दिला. असे असतानाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर म्हणून हिनविणाऱ्या राहुल गांधी यांचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…