सातारा : यंदाचा प्रजासत्ताक दिन दिमाखादार साजरा व्हावा. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या सारख्या योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती चित्ररथावर दर्शविण्यात यावी. प्रजासत्ताकदिनी चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभातील संचलनाबरोबर शहरातही फिरवावेत. यासाठी प्रशासकीय विभागाने समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. पालकमंत्री देसाई म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमाची सर्व प्रथम सातारा जिल्ह्यात सुरुवात करून या उपक्रमांतर्गत २९ हजार नागरिकांना थेट लाभ देण्यात आला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत एकट्या सातारा जिल्ह्यात ८ लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देऊन सातारा जिल्ह्यात उत्तम कामकाज करण्यात आले आहे. २६ जानेवारीला या दोन्ही योजनांवर आधारित चित्ररथ तयार करावा. या चित्ररथावर तालुकानिहाय लाभार्थ्यांची ठळक आकडेवारी द्यावी. तसेच मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट सुरु झाले आहे त्याचे फोटो असणाराही चित्ररथ तयार करावा. कृषी व जिल्हा परिषदेनेही आपल्या विभागाशी संबंधित बांबू रोपण व इतर महत्वाच्या विषयाशी संबंधित चित्ररथ तयार करावेत. या चित्ररथांचे प्रजासत्ताकदिनी संचलन झाल्यानंतर हे चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी शहरात देखील फिरवावे. शासकीय इमारतींसह शिवतिर्थ, राजवाडा अशा महत्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करावे. शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहे. यापुढेही अशाच पद्धतीने काम करा, असेही पालकमंत्री देसाई यांनी बैठकीत सांगितले.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…