मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूहल्ला झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद (Mohammad Shariful Islam Shehzad) या ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडे भारतीय असल्याचे ठोस पुरावे नाहीत. यामुळे तो बांगलादेशी असल्याचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केली. आरोपी बांगलादेशी असावा असा संशय निर्माण करणारे काही पुरावे जप्त केले आहेत. पण तपास सुरू असल्यामुळे या विषयावर अधिक माहिती देणे योग्य होणार नाही; असे मुंबई पोलिसांनी सांगितले. आरोपी भारतात विजय दास (बिजॉय दास) या नावाने वावरत होता. काही दिवस मुंबईत आणि नंतर मुंबई जवळच्या भागात तो वास्तव्यास होता. तो एका हाऊसकिपिंग कंपनीत बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी करत होता.
आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून पकडले. त्याने सैफवर हल्ला केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीला मुंबईत आणले असून त्याची चौकशी सुरू आहे. पुढील काही तासांत आरोपीला न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. आरोपीने चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात घुसखोरी केली होती. पण घरात विरोध झाला आणि आरोपीने चाकूने हल्ला केला; असे प्राथमिक चौकशीतून लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या सहकार्याने कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागे असलेल्या झुडपातून आरोपीला पकडले. आरोपी हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे असलेल्या मेट्रो बांधकाम स्थळाजवळील कामगार छावणीनजीकच्या झुडुपांमध्ये लपला होता. मोहम्मद ठाण्यातील ‘रिकीज’ बारमध्ये हाऊसकीपिंग कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याआधी तो एका पबमध्ये काम करत होता.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…