नाशिक : प्रेमविवाह केलेल्या पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून पतीने व्हिक्टोरिया पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या(Suicide) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मनोहर नथू गवांदे (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) यांचा मुलगा प्रीतम नथू गवांदे व आरोपी भारती गवांदे (वय ३२, दोघेही रा. पाथर्डी फाटा) यांनी प्रेमविवाह केला होता. दरम्यान, लग्नानंतर कोरोनाच्या साथीमुळे प्रीतम आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे आरोपी पत्नीने “मी तुझ्याशी प्रेम करून फसले. तू भिकारी आहेस. मला घटस्फोट दे,” असे म्हणून पती प्रीतम याला वडिलांकडून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली; मात्र त्यास प्रीतमने नकार दिला असता आरोपी पत्नीने त्याच्याशी वेळोवेळी भांडण करून वाद घातला. त्यानंतर पत्नीला परपुरुषाबरोबर आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याने त्याचा संताप झाला.
प्रीतमला पत्नीने शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. प्रीतमने दि. १२ ऑगस्ट रोजी व्हिक्टोरिया पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी मयत प्रीतमचे वडील मनोहर गवांदे यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पती प्रीतम याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी भारती गवांदेविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…