मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) एलटीसीअंतर्गत (LTC) सरकारी कर्मचाऱ्यांना वंदे भारत एक्स्प्रेस, हमसफर आणि तेजस सारख्या लक्झरी ट्रेनमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना आता ३८५ गाड्यांमध्ये प्रवास करण्याचा पर्याय आहे. ज्यात १३६ वंदे भारत एक्स्प्रेस, ९७ हमसफर व ८ तेजस एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. यापूर्वी, ते राजधानी, शताब्दी व दुरांतोसारख्या १४४ हाय-एंड ट्रेनमध्ये एसी प्रवासाचा आनंद घेऊ शकत होते. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) देशातील सर्व भागांत एलटीसी प्रवास बुकिंगसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. कार्मिक व प्रशिक्षण विभागाला एलटीसीअंतर्गत वेगवेगळ्या प्रीमियम ट्रेन्सबाबत सर्व कार्यालये व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनंतर हा निर्णय घेण्यात आला.
सर्व स्तरावरील सरकारी कर्मचारी अत्याधुनिक वंदे भारत, तेजस आणि हमसफर एक्स्प्रेसमध्ये जागतिक स्तरावरील प्रवासाच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या निर्णयानुसार आता कर्मचारी २४१ अतिरिक्त गाड्यांसाठी एलटीसी वापरू शकतात. या निर्णयामुळे, देशातील सर्व प्रदेशांमध्ये एकूण ३८५ गाड्या असतील जिथे त्या धावत आहेत. ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एलटीसी प्रवासासाठी तिकिटे बुक करता येतील.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पात्रतेनुसार, एलटीसी अंतर्गत तेजस एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि हमसफर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. एलटीसीचा लाभ घेणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी तिकिटांवर झालेला खर्चही परत मिळतो. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना जम्मू व काश्मीर, लडाख, अंदमान व निकोबार बेटे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी रजा प्रवास सवलत मिळण्यासाठी योजना दोन वर्षांसाठी वाढवली होती.
आता ही योजना २६ सप्टेंबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू असेल. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचारी या निवडक ठिकाणी प्रवास करण्यासाठी त्यांच्या होम टाऊन एलटीसीची देवाण-घेवाण करू शकतात. वंदे भारत, तेजस व शताब्दी एक्स्प्रेस या तीन गाड्यांमधील ११ व त्याखालील स्तरावरील कर्मचारी छोट्या व मध्यम अंतराच्या रेल्वे प्रवासात चेअर कारचाही वापर ते करू शकतात.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…