नवी दिल्ली : तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पोंगलच्या निमित्ताने आयोजित जल्लीकट्टू उत्सवात (Jallikat) सात जणांचा मृत्यू झाला. गर्दीतून बैल पळवण्याच्या या खेळात एकाच दिवसात ४०० हून अधिक जण जखमी झाले. तामिळनाडू पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, गुरुवारी कन्नम पोंगल दिवस होता. या दिवशी जल्लीकट्टू सर्वाधिक खेळला जातो. ७ लोकांव्यतिरिक्त पुदुक्कोट्टई आणि शिवगंगाई येथे २ बैलांचा मृत्यू झाला. ज्यांना जीव गमवावा लागला त्यापैकी बहुतेक हे खेळात सहभागी नव्हते, तर बैल मालक आणि प्रेक्षक होते.
पोलिसांनी सांगितले की, शिवगंगई जिल्ह्यातील सिरवायल मंजुविरट्टू येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तो या खेळात सहभागी झाला होता. त्याचवेळी मदुराईतील अलंगनाल्लूर येथे खेळ पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला बैलाने जखमी केले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्याच वेळी, विविध जिल्ह्यांमध्ये जल्लीकट्टूमुळे आणखी ५ लोकांचा मृत्यू झाला. २०२५ चा पहिला जल्लीकट्टू पुदुकोट्टईच्या गंदरवाकोट्टई तालुक्यातील थचंचकुरीची गावात सुरू झाला. यानंतर त्रिची, दिंडीगुल, मानापराई, पुदुक्कोट्टई आणि शिवगंगाई या जिल्ह्यांमध्येही याचे आयोजन केले जाऊ लागले. या खेळात ६०० हून अधिक बैलांचा समावेश करण्यात आला आहे.
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…