मुंबई : पुमा (PUMA) ही एक आघाडीची जर्मन बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी उच्च दर्जाचे अॅथलेटिक शूज, लाइफस्टाइल फूटवेअर आणि इतर क्रीडा पोशाख तयार करते. मात्र सध्या स्पोर्ट्स ब्रँडसाठी (Sports Brand) जगभरात नावाजलेली कंपनी पुमा चर्चेत आहे. स्पोर्ट्स ब्रँड पुमा इंडियाच्या अनेक स्टोअर्सवरील फलकांवर कंपनीचे नाव पुमा ऐवजी पीव्हीएमए (PVMA) केलं आहे. हे पाहता सर्वांना आश्चर्य वाटले आहे. परंतु पुमाने नावात केलेल्या या बदलात नेमकं काय कारण आहे, जाणून घ्या.
पुमाने इंडियाच्या अनेक स्टोअर्सवरील फलकांवर कंपनीचे नाव पुमा ऐवजी पीव्हीएमए केले आहे. याबाबत काहींनी ती स्पेलिंग चूक असल्याचे म्हटले तर अनेकांनी ती मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, पुमाने प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. पीव्ही सिंधूचा सन्मान करण्यासाठी आणि ही भागीदारी साजरी करण्यासाठी कंपनीने अनेक स्टोअरच्या साइनेजवर पुमाऐवजी पीव्हीएमएचा वापर केला आहे.
भारतातील बॅडमिंटनला नवीन उंचीवर नेण्याचे उद्दिष्टामुळे पुमा पीव्ही सिंधूसोबतच्या भागीदारीचा भाग म्हणून प्यूमा बॅडमिंटनसाठी एक विशेष उच्च-कार्यक्षमता श्रेणी सुरू करण्याची योजना आखत आहे. यामध्ये बॅडमिंटनसाठी आवश्यक असणारे विशेष पादत्राणे, कपडे आणि अॅक्सेसरीजचा समावेश असणार आहे. ही भागीदारी २०२५ च्या इंडिया ओपनपासून सुरू होणार आहे, असे पुमाने म्हटले आहे.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…