नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत अ गटामध्ये भारताचा पुरुष संघ आघाडीवर आहे. भारताच्या पुरुष संघाने नेपाळ आणि ब्राझिल या दोन्ही संघांविरूद्धचे सामने जिंकले. भारताच्या महिला संघाने दक्षिण कोरियाचा दारुण पराभव केला आणि अ गटात पहिले स्थान पटकावले.
भारताच्या पुरुष संघाने सोमवार १३ जानेवारी रोजी नेपाळ विरुद्धचा सामना ४२ – ३७ असा पाच गुणांच्या फरकाने जिंकला. यानंतर भारताच्या पुरुष संघाने मंगळवार १४ जानेवारी रोजी ब्राझिल विरुद्धचा सामना ६४ – ३४ असा ३० गुणांच्या फरकाने जिंकला. सलग दोन साखळी सामने जिंकत चार गुण मिळवणाऱ्या भारताने अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे.
भारताच्या महिला संघाने मंगळवार १४ जानेवारी रोजी दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना १७५ – १८ असा १५७ गुणांच्या फरकाने जिंकला. दक्षिण कोरियाचा दारुण पराभव करत भारताच्या महिला संघाने दोन गुण मिळवले आणि अ गटात पहिले स्थान पटकावले.
भारतीय पुरुष संघाचे उर्वरित साखळी सामने
बुधवार १५ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध पेरू रात्री ८.१५ वा.
गुरुवार १६ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध भूतान रात्री ८.१५ वा.
भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यास १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास १८ जानेवारी रोजी उपांत्य फेरीत खेळेल
भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास १९ जानेवारी रोजी अंतिम फेरीत खेळेल
भारतीय महिला संघाचे उर्वरित साखळी सामने
बुधवार १५ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध इराण संध्याकाळी ७ वा.
गुरुवार १६ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध मलेशिया संध्याकाळी ७ वा.
भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यास १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास १८ जानेवारी रोजी उपांत्य फेरीत खेळेल
भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास १९ जानेवारी रोजी अंतिम फेरीत खेळेल
खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघ : प्रतिक वायकर(कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो , सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिवा पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग. स्टँडबाय (राखीव खेळाडू) : अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील, विश्वनाथ जानकीराम.
खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघ : प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर., सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनु, मोनिका, नाझिया बीबी. स्टँडबाय (राखीव खेळाडू) : संपदा मोरे, रितिका सिलोरिया, प्रियांका भोपी.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…