अक्षय कुमारच्या उपस्थितीत पोकोच्या एक्स७ सीरिजचे दोन मोबाईल लाँच

Share

मुंबई : पोको या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या ग्राहक टेक ब्रँडने जयपूरमध्‍ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या उपस्थितीत एक्स७ सीरिजमधील पोको एक्‍स७ ५जी आणि पोको एक्‍स७ प्रो ५जी हे दोन मोबाईल लाँच केले. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी लाँच केलेले हे मोबाईल अतिशय आधुनिक आणि वेगवान असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

पोको एक्‍स७ ५जी मोबाईलची वैशिष्ट्ये :

  • टिकाऊ १.५के एएमओएलईडी ३डी कर्व्‍ह डिस्‍प्‍ले. हा डिस्प्ले ३००० नीट्स ब्राइटनेस आणि अद्वितीय मजबुतीसाठी कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस २ सह सुसज्‍ज आहे. आयपी६६, आयपी६८ आणि आयपी६९* (*सहाय्यक) रेटिंग्‍जसह एक्‍स७ ५जी पाणी, धूळ व रोजच्‍या आव्‍हानांमध्‍ये टिकून राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून स्‍मार्टफोन आकर्षक व प्रबळ राहण्‍याची खात्री मिळते.
  • मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० अल्‍ट्रा चिपसेटची शक्‍ती असलेला एक्‍स७ ५जी सुलभ, विना-व्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो. या स्‍मार्टफोनमधील ५५०० एएमएच बॅटरी दिवसभर पॉवरची खात्री देते, तर ४५ वॅट हायपरचार्ज डाऊनटाइम कमी करते, ज्‍यामुळे डिवाईस कमी वेळेत चार्ज होतो.
  • ५० मेगापिक्‍सल सोनी एलवायटी-६०० प्रायमरी कॅमेरा. कॅमेऱ्यात एफ/१.५ अर्पेचर व एआय-संचालित वैशिष्‍ट्ये. अंधुक प्रकाशात आकर्षक फोटोग्राफीसाठी एआय नाइट मोड आणि प्रभावी फोटो एडिटिंगसाठी एआय एरेज प्रो.
  • पोको यलो, कॉस्मिक सिल्‍व्‍हर आणि ग्‍लेशियर ग्रीन फिनिशेसमध्‍ये आकर्षकता व टिकाऊपणाचे, तसेच प्रबळ रचना दर्जासह प्रीमियम आकर्षकतेचे उत्तम संयोजन.

पोको एक्‍स७ प्रो ५जी मोबाईलची वैशिष्ट्ये :

  • पोको एक्‍स७ प्रो मध्‍ये भारतातील सर्वात मोठी ६५५० एमएएच बॅटरी आहे, जी उत्तम कार्यक्षमता, टिकाऊपणा व सुरक्षिततेसाठी सिलिकॉन कार्बन टेक्‍नॉलॉजी आणि प्रबळ इलेक्‍ट्रोलाइटने सुधारण्‍यात आली आहे. ९० वॅट हायपरचार्ज तंत्रज्ञान असलेली ही बॅटरी दिवसभर कार्यरत राहते आणि फक्‍त १९ मिनिटांमध्‍ये ० टक्‍के ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होते.
  • एक्‍स७ प्रो मीडियाटेक डिमेन्सिटी ८४०० अल्‍ट्रा प्रोसेसरवर कार्यरत आहे, जे जागतिक पदार्पण करत आहे. प्रखर गेमिंगसाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे प्रोसेसर २० टक्‍के जलद कार्यक्षमता, शाश्‍वत उच्‍च फ्रेम रेट्स आणि अपवादात्‍मक ब्राइटनेस लेव्‍हल्‍स देते. यामुळे गेम खेळण्यासाठी मोबाईल वापरणाऱ्यांना एक उत्तम अनुभव मिळतो.
  • १.५के रिझॉल्‍यूशन व ३२०० नीट्स सर्वोच्‍च ब्राइटनेस असलेल्‍या ६.६७-इंच एएमओएलईडी फ्लॅट डिस्‍प्‍ले. कॉर्नरिंग® गोरिला® ग्‍लास ७आय, २४० हर्ट्झ टच सॅम्प्लिंग रेट आणि २५६० हर्टझ त्‍वरित गेमिंग प्रतिसादासह एक्‍स७ प्रो स्‍ट्रीमिंग किंवा गेमिंग असो प्रत्‍येक टास्‍कसाठी आकर्षक व्हिज्‍युअल्‍स व अद्वितीय टच अचूकता देतो.
  • ऑप्टिकल इमेज स्‍टेबिलायझेशन (ओआयएस) असलेल्‍या ५० मेगापिक्‍सल सोनी एलवायटी-६०० कॅमेरा. एआय स्‍मार्ट-क्लिप, एआय नाइट मोड आणि एआय स्‍काय. निऑन-प्रकाशित रस्‍त्‍यांपासून फास्‍ट-अॅक्‍शन शॉट्सपर्यंत एक्‍स७ प्रो अद्वितीय फोटोग्राफी करण्यास सक्षम.
  • एक्‍स७ प्रो अँड्रॉइड १५ वर आधारित शाओमी हायपरओएस २.० असलेला पहिला डिवाईस आहे. या नेक्‍स्‍ट-जनरेशन ओएसमध्‍ये २९ भाषांचे एआय भाषांतर, एआय सबटायटल्‍स, एआय नोट्स आणि डायनॅमिक विजेट्स आहेत. या फोनमध्ये ३ वर्ष अँड्रॉईड अपडेट आणि ४ वर्ष सिक्‍युरिटी पॅचेस मिळतील.
  • एक्‍स७ प्रोमध्‍ये आयपी६६+ आयपी६८ व आयपी६९ (सहाय्यक) आणि आकर्षक, टिकाऊ डिझाइन आहे. पोको यलो, ऑब्सिडीयन ब्‍लॅक आणि नेबुला ग्रीनमध्‍ये उपलब्‍ध.

……………………

  • पोको एक्‍स७ प्रो – किंमत २४ हजार ९९९ रुपयांपासून सुरू
  • पोको एक्‍स७ ५जी – किंमत १९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू
  • दोन्ही मोबाईल डिव्हाईस फक्‍त फ्लिपकार्टवर उपलब्‍ध
  • पोको एक्‍स७ प्रोची विक्री १४ जानेवारी दुपारी १२ वाजल्‍यापासून सुरू होत आहे आणि पोको एक्‍स७ ची विक्री १७ जानेवारी दुपारी १२ वाजल्‍यापासून सुरू होत आहे.

Recent Posts

Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…

33 minutes ago

थेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…

36 minutes ago

IND-PAK तणावादरम्यान शिफ्ट झाला IPL चा सामना, आता धरमशाला नव्हे तर या ठिकाणी होणार सामना

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…

37 minutes ago

Gold rate: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…

1 hour ago

PBKS vs DC, IPL 2025: धरमशालामध्ये पाऊस थांबला, पंजाब किंग्सची पहिली फलंदाजी

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…

1 hour ago

पाकिस्तानकडून तणाव वाढवण्याचा प्रयत्न निष्फळ, भारताचे जशास तसे प्रत्युत्तर

नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…

2 hours ago