लासलगाव: धामोरी ते शिरवाडे रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भुत दिसले व भुताने त्या चालकाला मारहाण केली अशी चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात चालु झाली आहे. मात्र असा काही प्रकार नसून अंनिसचे कार्यकर्ते आमवस्थेच्या दिवशी तेथे राहून दाखवणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णाजी चांदगुडे यांनी दिली. भुत असल्याचे खरे वाटावे म्हणून काही फोटो व चित्रफित प्रसारित करण्यात येत आहे.
चित्रफीतमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहे.वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे फोटोत दिसत आहे.त्यामुळे या रस्त्याने जाण्यास प्रवाशांना भिती वाटायला लागली आहे. दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे. जगामध्ये भुत अस्तित्वात नसते.तरीही त्याची भिती दाखवली जाते कारण, भुत हे मनात असते. लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो. त्यामुळे या प्रकाराबाबत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.
सदरच्या फोटोचे निरक्षण केल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात येते. सदर चित्रफित व फोटो एडिट केले असल्याचे स्पष्ट होते. शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमातून फिरत आहे. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते अमावशेच्या रात्री सदर ठिकाणी राहुन दाखविणार आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भुताची भीती जाण्यास मदत होईल व प्रकरणाचा फोलपणा लक्षात येईल. भिती वाटणार्या लोकांच्या मनातील भुताबद्दलचे गैरसमज जावे यासाठी धामोरी गावात कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचा व प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम घेणार आहे. शिवाय शाळेमधुनही विद्यार्थ्यांत वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणार आहे. त्यामुळे भुत निघाले ही अफवा असुन रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये असे चांदगुडे यांनी शेवटी म्हटले आहे.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…