पुणे : पुणे-सोलापूर दरम्यानचा रेल्वे प्रवास आता अधिक वेगात होणार आहे. या रेल्वे मार्गावरील पटरी आणि इतर कामे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढला आहे. रेल्वेच्या वाढलेल्या वेगाने सोलापूरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता पुण्यात अवघ्या सव्वातीन तासात पोहोचता येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवास ३५ ते ४० मिनिटांनी कमी होणार आहे. जवळपास ८८ एक्सप्रेस रेल्वेचा वेग आता ११० वरून १३० इतका झाला असल्याची माहिती आहे.
पुणे-दौंड-सोलापूर सेक्शनवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या सुधारणांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये ट्रॅक सुधारणा, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे दौंड-सोलापूर-वाडी सेक्शनवर (३४१.८० किमी) अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेग ११० किमी प्रतितास वरून १३० किमी प्रतितास पर्यंत वाढला आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्र सरकारने गुरुवार ८ मे…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्ली सुरुवातीला ज्या वेगाने चालली होती त्या वेगाला खीळ बसली असून गेले तीन…
ऑपरेशन सिंदूर नंतर घेण्यात आला निर्णय नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर' नंतर राजधानी दिल्लीसह देशभरातील…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर मोठा एअरस्ट्राईक केला.…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९…
नवी दिल्ली : पहलगाममधील २६ हिंदूंच्या टार्गेट किलींगनंतर भारताने मंगळवारी मध्यरात्रीनंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील…