Share

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

जीवनविद्येच्या अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांतानुसार परमेश्वर हा कृपाही करत नाही व कोपही करत नाही. त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचा नवस केल्याने, यज्ञयाग केल्याने किंवा अनेक प्रकारची कर्मकांडे केल्याने देव प्रसन्न होतो हा केवळ एक भ्रम आहे. प्रत्यक्षात परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचे मार्ग आहेत ते वेगळेच आहेत. परमेश्वराची कृपा संपादन करायचे असेल, त्याला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे परमेश्वर कृपा किंवा कोप करत नाही हे जितके खरे आहे तितकेच हे ही खरे आहे की परमेश्वराकडून कृपा किंवा कोप होतो. तुम्ही म्हणाल हे असे कसे? एकदा म्हणता परमेश्वर कृपा किंवा कोप करत नाही आणि नंतर म्हणता परमेश्वराकडून कृपा किंवा कोप होतो. हे असे कसे ते मी आता सांगतो.

गंमत अशी आहे की, परमेश्वराचा संबंध निसर्ग नियमांशी आहे हे पहिले लक्षात ठेवले पाहिजे. ही गोष्ट जर नीट लक्षात घेतली नाही तर धर्म ही संकल्पना चुकते. धर्माच्या नावाखाली आज जो गोंधळ चाललेला आहे, त्याचे कारण निसर्गनियमच कुणी लक्षात घेतले नाहीत. निसर्गाचे नियम मानवी जीवनात निर्णायक आहेत. आपण जर धर्माचा इतिहास पाहिला, मानवजातीचा इतिहास पाहिला, संस्कृती पाहिली तर निसर्गाचे नियम मानवी जीवनात महत्त्वाचे आहेत हा सिद्धांतच इतर कोणी मांडला नाही. तो जीवनविद्येनेच प्रथम मांडला.

परमेश्वराची कृपा किंवा कोप होणार ते निसर्गनियमांना अनुसरूनच. परमेश्वराकडून कृपा किंवा कोप होतो, परमेश्वर करत नाही. होणे व करणे हे दोन्ही शब्द नीट लक्षात घेणे हेच महत्त्वाचे. होणे वेगळे व करणे वेगळे. परमेश्वराची कृपा होणे व कृपा करणे या दोन्ही शब्दांत फरक आहे. निसर्गाचे नियम मानवी जीवनात महत्त्वाचे आहेत, ही गोष्ट लक्षात आली तर सर्व कर्मकांडे गळून पडतात. निसर्गाच्या नियमांचे महत्त्व कळले तर आता प्रचलित असलेल्या धर्मांच्या संकल्पना किती बोथट व चुकीच्या आहेत हे कळेल. तुमच्या जीवनात जी सुख किंवा दुःख निर्माण होतात त्यात माणसाकडून घडणारे कर्म व निसर्गाचे नियम दोन्ही महत्त्वाचे आहेत, कारण हे दोन्ही एकत्र येऊनच नियती नावाची गोष्ट निर्माण होते. कर्म आणि निसर्गाचे नियम हे दोन्ही एकत्र येतातच म्हणजे माणसाने कर्म केले की, निसर्गाचे नियम सक्रिय होतात. निसर्गाच्या नियमांना सक्रिय करण्याचे काम आपण कर्माच्या द्वारे करतो.

Tags: nature

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

4 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

4 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

4 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

5 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

5 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

6 hours ago