मुंबई : मालाड (Mumbai ) येथील कुरार भागात एक विचित्र आणि संतापजनक घटना (Crime News) घडली आहे. चोरीसाठी घरात घुसलेल्या चोरट्याला काहीही मौल्यवान वस्तू सापडल्या नाहीत, म्हणून त्याने घरात असलेल्या महिलेचं चुंबन घेतलं आणि तिथून पळ काढला. या प्रकरणात महिलेने तातडीने मालाडच्या कुरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही पाहून चोराला अटक केली आहे.
कुरार परिसरातील एक ३८ वर्षीय महिला घरी एकटीच होती. चोरीच्या उद्देशाने चोर घरात शिरला आणि घरातील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही हाती न लागल्याने, चोरट्याने महिलेची पप्पी घेतली आणि पळून गेला. ही घटना ३ जानेवारी रोजी घडली.
महिलेच्या तक्रारीनुसार, चोरट्याने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि महिलेला धाक दाखवून मौल्यवान वस्तू, मोबाइल, रोख रक्कम, किंवा एटीएम कार्ड देण्याची मागणी केली. परंतु घरात अशा वस्तू नसल्याचं महिलेने सांगितल्यानंतर चोराने हे अजब कृत्य केलं.
महिलेच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी तपास सुरू केला आणि चोराला अटक केली. संबंधित चोर मालाड भागातच आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, त्याचा कोणताही पूर्वगुन्हेगारी रेकॉर्ड नाही. परंतु त्याच्याविरोधात महिलेच्या विनयभंगाचा आणि दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने दाखवलेली तत्परता आणि तक्रारीमुळे आरोपीला वेळीच अटक करण्यात यश आलं.
या घटनेचा पुढील तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकाराने स्थानिकांमध्ये चोरट्यांच्या विकृत मानसिकतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…