Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis : ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून होतेय ड्रग्जची देवाणघेवाण!

CM Devendra Fadnavis : ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून होतेय ड्रग्जची देवाणघेवाण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल; पोलिसांना दिले निर्देश

नवी मुंबई : ड्रग्जने पंजाबसारखे आपले राज्यही पोखरायला सुरुवात केली आहे. वेळीच ते पोलिसांच्या लक्षात आले आहे. पोलिसांनी धडक कारवाई करत काही पेडलर्सना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीत सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन पार्सलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची देवाणघेवाण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून असे गैरव्यवहार शोधून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. ते आज नवी मुंबई येथील नशामुक्त नवीमुंबई या कार्यक्रमात बोलत होते.

Siddharameshwar Yatra : श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल!

दरम्यान, आजच्या या नशामुक्त नवीमुंबई या नवीन पर्वाच्या शुभारंभ प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, सुप्रसिद्ध अभिनेते आणि ड्रग्जमुक्त नवी मुंबई अभियानाचे ब्रँड अम्बॅसिडर जॉन अब्राहम (John Abhraham), आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre), महेश बाल्डी, प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील यांसह पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, दिपक साकुरे, संजय एनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले की, अतिशय महत्त्वाचं कँपेन नवी मुंबई पोलिसांनी लॉन्च केले आहे. पुन्हा मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली आणि होम मिनिस्टरची पहिली बैठक घेतली त्यावेळी ज्या मुद्द्यांवर पुढील पाच वर्ष फोकस करायचा आहे त्यामुद्द्यांचा परामर्ष मी घेत होतो,. त्यामध्ये पोलिस विभागाला सांगितलं ड्रग्ज विरुद्ध मोठी लढाई लढायची आहे.

आज आपला देश एक मजबूत देश म्हणून पुढे येत आहे. जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ही भारताची व्यवस्था झाली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वात एक बलशाली भारत आपण पाहतोय ज्याकडे कोणीच वाकड्या नजरेने पाहत नाही. मात्र आता या देशाला व्यसनाधीन कसं करता येईल हे युवा अवस्थेतच कशाप्रकारे संपवता येईल असा डाव देशात सुरु झाला. त्यानंतर देशात वेगवेगळ्या प्रकारचे अमलीपदार्थांचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -