नवी दिल्ली: दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या(Delhi Assembly Election) तारखांची आज घोषणा होत आहे. निवडणूक आयोग दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार असून यावेळेस तारखांची घोषणा केली जाणार आहे. दिल्लीतील ७० विधानसभेच्या जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होऊ शकतात.
निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळेसही दिल्लीत आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात सामना पाहायला मिळेल. याआधी सोमवारी निवडणूक आयोगाने शेवटची मतदार यादी जाहीर केली होती. दिल्लीत यावेळेस एकूण १ कोटी ५५ लाख २४ हजार ८५८ मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दिल्लीत यावेळेस एकूण १.५५ कोटींपेक्षा अधिक मतदार असतील. यात पुरुष मतदारांची संख्या ८३,४९, ६४५ आणि महिला मतदारांची संख्या ७१, ७३,९५२ इतकी आहे. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १२६१ आहे.
निवडणूक आयोगाने सोमवारी दिल्लीतील मतदाराची शेवटची यादी जाहीर केली होती. यासोबतच मतदार यादीतून मतदारांचे नाव वगळल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर मतदार यादीतून मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला होता.
दिल्लीमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६० जागा जिंकत सरकार स्थापन केले होते. २०१५च्या निवडणुकी आम आदमी पक्षाने ६७ जागा जिंकल्या होत्या. दिल्लीच्या इतिहासात एखाद्या पक्षाने पहिल्यांदाच इतक्या जागा जिंकल्या होत्या.
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…