Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजHMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; लवकरच सरकार जाहीर करणार प्रतिबंधात्मक उपायांसाठी...

HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; लवकरच सरकार जाहीर करणार प्रतिबंधात्मक उपायांसाठी मार्गदर्शक तत्वे

मुंबई : कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा जग एचएमपीव्ही व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) या चीनमधील व्हायरसमुळे (HMPV virus) पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. त्यातच नागपूरमध्ये दोन लहान मुलांना या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) व्हायरसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागासह सर्व संबंधित अधिका-यांशी ऑनलाईन चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पध्दतीने संवाद साधणार आहेत.

सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले. त्यानंतर आता नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. सात वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागसह सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

Nashik News : नाशिकमध्ये चाललंय तरी काय? लग्नघरी शोककळा, आई-वडिलांनी का केली आत्महत्या?

मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला कार्यालये स्वच्छ ठेवणे, औषधे, ऑक्सिजन आणि विलगीकरण सुविधा तयार ठेवणे यासारख्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहण्याचे आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा आजार गंभीर नसल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि इतर गंभीर आजार असणा-यांनी काळजी घ्यावी. राज्यात सध्या HMPV संसर्गाचा एकही नवा रुग्ण नाही. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

सरकार लवकरच प्रतिबंधात्मक उपायांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, १०० दिवसात प्राधान्याने करावयाची कामे याबाबत आढावा घेतला जाणार आहे. विभागासोबत आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा १०० दिवसांचे टार्गेट दिले जाणार असल्याची माहिती आहे. आपल्या वेबसाईट सुसज्ज करा, माहिती अधिकारात मागितली जाते, अशी सर्व माहिती त्यावर आधीच टाका, ती संकेतस्थळे सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. कार्यालयांची सफाई करा, अनावश्यक कागदांचे ढीग रिकामे करा. वाहनांचे भंगार साफ करा. कार्यालय स्वच्छ ठेवा. पिण्याचे पाणी, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिका-यांच्या सरप्राइज भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे. इज ऑफ लिव्हिंग लक्षात घेता किमान २ सुधारणा, नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर पेंडिंग कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. सामान्य माणूस कोणत्या वेळेत भेटायला येऊ शकतो, त्याची सुस्पष्ट माहिती पाटीवर नमूद करा. ९० टक्के बाबी स्थानिक पातळीवर सुटू शकतात. पण ते होत नाही, म्हणून मंत्रालयात गर्दी होते. लोकशाही दिनसारखे उपक्रम राबवा. गुंतवणुकीसाठी लोक येतात, तेव्हा त्यांना कुणीही त्रास देत नाही, हे सुनिश्चित करा. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. फ्लॅगशिप कार्यक्रम/योजनांना भेटी तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र येथे भेटी झालेच पाहिजे. ही सर्व कामे होत आहेत की नाही, याकडे पालक सचिवांनी लक्ष घालावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -