मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. या दौऱ्यावेळी त्यांनी आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल, असे देखील म्हटले. या दौऱ्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्याचे सामना अग्रलेखातून कौतुक करण्यात आले आहे. “बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत”, अशा शब्दांनी कौतुकाची थाप देण्यात आली आहे.
Thane Hoardings Mission : ठाण्यात अनधिकृत फलक हटविण्याची मोहीम
काय म्हणाले संजय राऊत ??
शिवसेनाचे (उबाटा) मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. ‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ याऐवजी गडचिरोलीला ‘पोलाद सिटी’ ही नवीन ओळख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हाती घेतलेला विडा आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल. तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री कौतुकास पात्र आहेत!, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.