पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व अजिंक्य
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला ऐतिहासिक तिसरा विजय केवळ त्यांचे वैयक्तिक वलयच अधिक तेजस्वी करत नाही, तर भारतीय राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वाची मोहर उमटवतो. आज पंतप्रधान मोदी हे भारतासाठी स्थैर्याचे प्रतीक बनले आहेत, तर भाजपा हा सुशासनाचे प्रतिरुप असलेला पक्ष म्हणून उदयास आला आहे, हे यावरून दिसून येते. २०२४ मध्ये, प्रमुख लोकशाही राष्ट्रांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात पसरलेली लाट जागतिक होती. या लाटेत, या सत्ताधाऱ्यांना लक्षणीय पराभवाच्या गटांगळ्या खाव्या लागल्या. अमेरिकेत, डेमोक्रॅट्सनी संसदेच्यादोन्ही सभागृहांमध्ये संख्याबळाचे बहुमत आणि अध्यक्षपद गमावले. इंग्लंडने, कंझर्व्हेटिव्ह पक्षाला निर्णायक पराभव स्वीकारत सत्तेतून पदच्यूत होताना पाहिले. त्याचप्रमाणे, फ्रान्स, दक्षिण कोरिया आणि पोलंडमध्ये सत्ताधारी पक्ष सत्तेतून पायउतार झाले. जागतिक कल हा असा असताना, ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळात हे घडवत विजयाची चव चाखायची किमया साधली. २०१४ आणि २०१९ मध्ये मिळवलेल्या स्पष्ट विजयानंतर, भारतीय मतदारांनी पुन्हा एकदा मोदींवर विश्वास व्यक्त करत ठोस जनादेश दिला. हा विजय म्हणजे आंतरराष्ट्रीय सत्ताविरोधी लाटेला एक उल्लेखनीय अपवाद ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ या वर्षात, भाजपाने काही लक्षणीय विजयांची नोंद केली. पंतप्रधान मोदींनी ऐतिहासिक तिसरा कार्यकाळ जिंकला. भारताच्या राजकीय इतिहासात ही कामगिरी देदीप्यमान आहे, कारण १९६२ नंतर कोणत्याही अन्य नेत्याला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ मिळवता आला नाही.
अस्थिर जगात स्थिर नेतृत्व एक दशकाहून अधिक काळ सत्तेत राहिलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत २०१४ पासून, राजकीय स्थैर्याचा दीपस्तंभ म्हणून उभा आहे. विशेषत: त्याच काळात जगातील इतर लोकशाही राष्ट्रांना राजकीय धक्के सोसावे लागत असताना, तुलनेने हे सातत्य विलक्षण आहे. दूरगामी आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्र धोरणविषयक उपक्रम राबवणारे एक सुसंघटित सरकार, हे मोदींच्या कार्यकाळाचे भूषण आहे आणि जागतिक शक्ती म्हणून भारताच्या उदयास हातभार लावत आहे. याउलट, अमेरिकेने नाट्यमय राजकीय बदलांची मालिका अनुभवली आहे. बराक ओबामा यांच्या २०१७ पर्यंतच्या अध्यक्षपदानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सत्ता गेली. त्यांनी पूर्णपणे भिन्न धोरणे आणि अधिक अलिप्ततावादी असा फटकून वागण्याचा पवित्रा बाळगला. २०२१ मध्ये, जो बिडेन यांनी अनेकांना सांभाळून घेणारी बहुलता आणि देशांतर्गत गुंतवणुकीवर जोर देऊन ट्रम्प यांची अनेक प्रमुख धोरणे उलटी वळवली.
२०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुका ऐतिहासिक कशा ठरतात? मतदारांचा भरभरून प्रतिसाद आणि नागरी आचारसंहितेचे पालन या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा २०२४ च्या निवडणुकीमुळे भारत एक लवचिक लोकशाही असल्याचे चित्र जगासमोर आले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे-ईव्हीएमवर मोठ्या प्रमाणात झालेली टीका आणि उन्हाचा प्रचंड तडाखा असूनही, लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करून मोठा उत्साह दाखवला. नवमतदारांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, सर्व वयोगटातील आणि समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी लोकशाही प्रक्रियेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे. काश्मीरमध्ये १९९६ पासून गेल्या ३ दशकांत पहिल्यांदाच सर्वाधिक ३८% इतक्या मतदारांच्या सहभागाची नोंद झाली. भारतीय राजकारणात अधिक समावेशकता दिसून आली कारण अधिकाधिक महिलांनी निवडणूक लढवली आणि जिंकली. २०२४ च्या निवडणुकांनी, नागरिक त्यांच्या प्राधान्यक्रमांबाबत आणि नेत्यांकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षांबद्दल किती जागरूक झाले आहेत हे अधोरेखित करत, भारताची लोकशाही प्रगल्भ होत असल्याचे दाखवून दिले. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाच्या बाजुने लोक भक्कमपणे उभे राहिले.
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान व्यवस्थित सुरू आहे की नाही यासाठी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे-मतदानाची शहानिशा करून कागदी मागोवा घेणारी यंत्रे यांचा यादृच्छिक उपयोग करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वापरालाही भरपूर दाद मिळाली. भारत ही परिपक्व लोकशाही आहे हे स्पष्ट करत, भारताने पंतप्रधान मोदींना, सलग तीन वेळा यशस्वीपणे कार्यकाळ भूषवणाऱ्या निवडक जागतिक नेत्यांच्या मालिकेत स्थान मिळवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ओडिसात सत्ताधारी बिजू जनता दलाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. ज्यामध्ये भाजपाच्या जागा फक्त १ वरून ६ वर आल्या आहेत. २०१९ मध्ये बीजेडीने १२ जागा, तर भाजपाने ८ जागा जिंकल्या होत्या. हा बदल लक्षणीय स्थित्यंतर दाखवून देतो. लोकसभा निवडणुकीतील यशाबरोबरच ओडिसा विधानसभा निवडणुकीतही भाजपाने लक्षणीय प्रगती केली. पक्षाने १४ जागा जिंकल्या आणि इतर ६६ मतदारसंघात आघाडीवर आहे. महाराष्ट्राच्या प्रचंड विजयाने विरोधकांचे तोंड बंद
एका ऐतिहासिक विजयात, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभेत सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. एखाद्या नेत्याने राज्याला अशा दणदणीत विजय मिळवून देण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपाने राष्ट्रवादी आणि त्यांच्या इतर मित्रपक्षांसह १३१ जागांवर विजय मिळवला, तर विरोधी महाविकास आघाडीला (एमव्हीए) फक्त ५१ जागा मिळाल्या. सत्ताधारी आघाडीने २३० हून अधिक जागांवर आघाडी घेतली यावरुन, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर लोकांचा गाढ विश्वास दिसून येतो. २८८ पैकी १३२ जागांसह, भाजपाने राज्यात ४५% जागा मिळवून आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भाजपाचा हा विजय, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील कोणत्याही पक्षासाठी आतापर्यंतची, जिंकलेल्या जागांची वाटा दर्शवणारी सर्वाधिक टक्केवारी ठरली आहे. यामुळे भाजपाचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून, त्यांनी राज्यातील विरोधकांचे तोंड निर्विवादपणे बंद केले आहे.
(केंद्रीय पत्रसुचना कार्यालय)